Next
बर्वे स्मृती कथाकथन, नाट्यछटा स्पर्धांचे बक्षीस वितरण
BOI
Monday, December 24, 2018 | 03:32 PM
15 0 0
Share this story

विजेते विद्यार्थी

रत्नागिरी :
कै. गणेश व कै. सरस्वती बर्वे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रय व सौ. सविता बर्वे पुरस्कृत कथाकथन, नाट्यछटा स्पर्धा रत्नागिरीत नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या. एसटीतील निवृत्त अधिकारी सुजाता भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ डिसेंबर २०१८ रोजी आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरात या स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

स्पर्धांचे परीक्षण दीप्ती कानविंदे आणि स्वाती रानडे यांनी केले. भालेकर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. या वेळी मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांच्यासह सहशिक्षिका दर्शना जोशी, प्रज्ञा काळे, एकता कांबळे, अनघा भेलेकर, समीक्षा केतकर, श्रुती लिंगायत, सानिका तुपे, नीलम डांगे आदी उपस्थित होत्या. या वेळी प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी नाट्यछटा सादर केल्या.

सविस्तर निकाल असा : (अनुक्रमे प्रथम तीन)

कथाकथन स्पर्धा : 
अ गट : गार्गी देवल, चिन्मय दामले, मिहिर खाडिलकर.
ब गट : श्रीवेद सनगरे, आदित्य घडशी, विराज जाधव.
क गट : श्रेयस घाणेकर, आदित्य गोठणकर, देवश्री धुमक. 

नाट्यछटा स्पर्धा :
अ गट : अर्णव जोगळेकर, श्रीया बाणे, अर्णव पटवर्धन.
ब गट : मुद्रा जोशी, स्वरा साळुंखे, दूर्वा मेणे.
क गट : आस्था कांबळे, रुद्र सनगरे, विघ्नेश जोशी.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link