Next
नांदेडच्या योगेश मुंडकरने सलग तिसऱ्यांदा जिंकला परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड
नागेश शिंदे
Wednesday, March 20, 2019 | 01:03 PM
15 0 0
Share this article:हिमायतनगर :
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराची यात्रा देशभरात प्रसिद्ध असून, येथील कुस्तीचा फडही गाजलेला आहे. १८ मार्च रोजी झालेल्या दंगलीत अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती नांदेडच्या योगेश मुंडकरने जिंकली. त्यामुळे तो बजरंग दलाच्या हिमायतनगर शाखेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या सात हजार रुपयांच्या बक्षिसाचा सलग तिसऱ्या वर्षी मानकरी ठरला आहे. युवकांनी त्याची जल्लोषात मिरवणूक काढली. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेची सांगता कुस्त्यांच्या दंगलीने होते. १८ मार्चला दुपारी एक वाजता कुस्तीला सुरुवात झाली. परमेश्वर मंदिराचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, लक्ष्मण शक्करगे, माधव पाळजकर, अनंता देवकते, मूलचंद पिंचा, अनिल मादसवार, यात्रा कमिटी उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव संजय माने, नगराध्यक्ष कुणाल राठोड, गजानन चायल, अश्रफभाई, गजानन चायल, गोविंद शिंदे, राम नरवाडे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुसिंग ठाकूर, प्रभाकर मुधोळकर, अन्वर खान, खुदूस मौलाना, विठ्ठल ठाकरे, बालाजी पतंगे, बाबुराव बोड्डेवार, विकास नरवाडे, राजू गाजेवार, सावन डाके, कल्याण ठाकूर, सरदार खान, प्रकाश जैन, साईनाथ धोबे, अनिल भोरे यांच्या उपस्थितीत बालमल्लांच्या कुस्तीने दंगलीला सुरुवात झाली. यामध्ये जिंकलेल्या बालकांना संत्र्याचा प्रसाद देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर दिवसभर तळपत्या उन्हात विदर्भ - मराठवाड्यातून दाखल झालेल्या अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती ज्ञानेश्वर खैरे आणि राजू बितनाळीकर या दोघांत आणि सागर पाटील (पुणे) आणि नीलेश बोरगडीकर या दोघांमध्ये झाली. यामध्ये विजयी झालेल्या मल्लांना नीलेश प्रत्येकी दोन हजारांचे बक्षीस देण्यात आले. त्यानंतर शेवटची, अव्वल क्रमांकाच्या मानाची कुस्ती सायंकाळी ६.३० वाजता प्रकाशझोतात झाली. नांदेडचा योगेश मुंडकर व औरंगाबादचा स्वप्नील पहिलवान या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांची लढत चांगलीच रंगली. हलगीच्या तालावर जवळपास १५ मिनिटे  चाललेल्या कुस्तीत औरंगाबादच्या मल्लास धूळ चारत नांदेडच्या मुंडकरने कुस्तीचा फड जिंकला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी योगेश मुंडकरला उचलून घेऊन जल्लोष केला. तसेच श्री परमेश्वर मंदिरापर्यंन्त मिरवणूक काढली. या फडात एकूण ६१ हजारांहून अधिक रुपयांच्या पारितोषिकांच्या कुस्त्या मंदिर ट्रस्टचे संचालक, यात्रा कमिटी सदस्य व हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. कुस्तीचा रंगतदार फड पाहण्यासाठी हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, उमरखेड, नांदेड, परभणीसह तेलंगण राज्यातील अनेक पहिलवान व कुस्तीशौकीनांनी हजेरी लावली होती.  

महिमा राठोड विजयी
यात्रेमध्ये पुसद येथील महिमा राठोड ही १८ वर्षीय युवती युवकांसोबत कुस्ती खेळली. जवळपास १५ मिनिटे चालेल्या या कुस्तीच्या खेळामध्ये चित्ताथरारक कसब दाखवून महिमा प्रतिस्पर्धी युवकाला चीत करून कुस्तीचा फड जिंकला. तिच्या या यशाबद्दल कुस्तीशौकिनांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच अनेकांनी तिला बक्षीस देऊन गौरविले.  

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search