Next
‘वाइड विंग्ज’तर्फे ‘पुणे नाट्यसत्ताक २०१९’ची घोषणा
प्रेस रिलीज
Saturday, January 05, 2019 | 11:10 AM
15 0 0
Share this article:

रंगसंगीत करंडक विजेती एकांकिका ‘जेफॉरयू’

पुणे : वाइड विंग्ज मीडिया यांच्या वतीने चौथ्या ‘पुणे नाट्यसत्ताक २०१९’ महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. ११ ते १३ जानेवारी व १८ ते २० जानेवारी अशा दोन टप्प्यात हा महोत्सव होणार असून, २३ संस्था, २३ सादरीकरणे, पाच नाट्यगृहे असे या महोत्सवाचे स्वरूप असेल. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवातील सादरीकरणे सुदर्शन रंगमंच, ज्योत्स्ना भोळे सभागृह, भारत नाट्यमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व बालगंधर्व रंगमंदिर येथे होतील.

पुण्यातील सर्व नाट्यरसिकांना एकाच छताखाली सर्वोत्तम नाटके पाहण्याची संधी या महोत्सवातून मिळणार असून, महोत्सवाचे आकर्षण असलेली नाट्यसत्ताक रजनी हा संपूर्ण रात्रभर चालणारा पुण्यातील पहिला नाटकांचा जागर २५ जानेवारीला रात्री नऊ वाजता सुरू होऊन २६ जानेवारीला सकाळी सात वाजता संपेल. याचवेळी महोत्सवाचीही सांगता होईल.

डॉ. मोहन आगाशे यांची भूमिका असलेले ‘जरा समजून घ्या’ नाटक

महोत्सवाची सुरुवात ११ जानेवारीला रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिर येथे सतीश आळेकर दिग्दर्शित व लिखित ‘महानिर्वाण’ या नाटक कंपनीच्या नाटकाने होईल, तर सांगता २० जानेवारीला रात्री ९.३० वाजता निरंजन पेडणेकर यांच्या ‘शाही पहारेदार’ या नाटकाने भारत नाट्यमंदिर येथे होईल. या नाटकाचा त्या दिवशी शुभारंभाचा प्रयोग असून, यात सुव्रत जोशी व ओमकार गोवर्धन यांनी काम केले आहे. या सोबतच अतुल पेठे यांचे ‘परवा आमचा पोपट वारला’ याचे अभिवाचन असेल. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे ‘जंबा बंबा बू’ हे बालनाट्य व ‘जरा समजून घ्या’ ही नाटक सादर होतील. ‘जरा समजून घ्या’मध्ये डॉ. मोहन आगाशे यांनी काम केले आहे. नाट्य जंक्शन थिएटरचे ‘जीवन एक रंगमंच’ हे हिंदीतील नाटकही महोत्सवात सादर होणार आहे.

अहमदनगरच्या पेमराज सरडा कॉलेजची पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका ‘पीसीओ’, पुण्यातील चक्रीची विजेती एकांकिका ‘विपाशा’, रंगसंगीत करंडक विजेती एकांकिका ‘जेफॉरयू’, तसेच राज्यनाट्य स्पर्धा व ‘सीव्हायएफआय’ करंडक विजेती एकांकिका ‘आय अॅग्री’ यादेखील महोत्सवात सादर केल्या जाणार आहेत. राज्यातील एकमेव माइम प्लेची स्पर्धा मौनांतर करंडक स्पर्धेतील द्वितीय विजेती ‘ओह शीट’ ही पुण्यातील संवर्धन संस्थेची एकांकिका आणि गरवारे कॉलेजची ‘थेस्पो’ ही अंतिम फेरीसाठी निवड झालेली एकांकिका, गिरीश परदेशी यांचे अनेक महोत्सवात गाजलेले हिंदी-इंग्लिश नाटक ‘Hash Ernesto Tag Guevara’, महाराष्ट्र कल्चरल सेंटर व सोनिया क्रिएशन्सचे चिन्मय मांडलेकर आणि ऋषिकेश जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले ‘जुगाड’, वाइड विंग्ज मीडिया व फोर्थ वॉल निर्मित ‘बम्बई’ हे नवीन हिंदी नाटक, गरवारे कॉलेजची विनोदोत्तम करंडक विजेती एकांकिका ‘व्हाइट कॉमेडी’ यांचे या वेळी सादरीकरण होईल. त्याचप्रमाणे पुण्यातील तरुण कलाकारांनी मिळून सुरू केलेल्या ‘आजकल’ या संस्थेचे ‘Zabriko’ हे नाटक व निळू फुले कला अकादमीचे ‘वाफाळलेले दिवस’ यांचे अभिवाचन होणार आहे.  

सतीश आळेकर दिग्दर्शित व लिखित ‘महानिर्वाण’

जाई काजळ व वेदार्थ स्टुडिओज हे महोत्सवाचे प्रायोजक असून, महोत्सवाची तिकिटे व पुर्णोत्सव पत्रिका (सीझन पासेस) सहा जानेवारीपासून संबंधित नात्यागृहांवर उपलब्ध होणार आहेत.

ऑनलाइन बुकिंगसाठी : www.ticketees.com
संपर्क : ७४४७४ ०५८४४  

‘परवा आमचा पोपट वारला’चे अभिवाचन करताना अतुल पेठे

‘बम्बई’ या हिंदी नाटकातील एक क्षण
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search