Next
चंदेरी गावात फेरफटका
BOI
Wednesday, February 07 | 06:45 AM
15 0 0
Share this story

कोशक महाल
‘करू या देशाटन’मध्ये आपण गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील ओरछा नगरीमध्ये सैर केली. आज सहल करू या नावाप्रमाणेच असलेल्या चंदेरी या ठिकाणी...
.............
चंदेरी साड्यासुंदर कशिदाकारी साडीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे चंदेरी. मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यात हे ठिकाण असून, महाभारतातही या गावाचा उल्लेख आहे. पर्शियन विद्वान अल्बुरूनी याने इ. स. १०३०मध्ये येथे भेट दिल्याचा उल्लेख आहे. हे पूर्वी व्यापाराचे एक ठिकाण होते. प्रामुख्याने हस्तकला वस्तू व कापड यांचा व्यापार येथे चालत आलेला आहे. येथे अनेक हातमाग असून, विणकर साडी तयार करतात. येथे तयार झालेल्या साड्या चंदेरी साड्या म्हणून प्रसिद्ध आहेत.

अकबरकालीन प्रसिद्ध ध्रुपदगायक बैजू बावरा याची कबर येथे आहे. चंदेरी किल्ला हे इतिहासाच्या शौर्यगाथेतील एक चमकते पान आहे. बाबराने चंदेरीवर हल्ला केला; पण अवघड जागी असलेला किल्ला जिंकणे कठीण होते. असे म्हणतात, की बाबराने एका रात्रीत डोंगर तोडून चंदेरीच्या प्रवेशद्वारासमोर सैन्य उभे केले. तेव्हापासून त्या जागेला ‘कटी हुई पहाडी’ असे संबोधले जायचे. जेव्हा पराभव दिसू लागला, तेव्हा किल्ल्यावरील राजपूत स्त्रियांनी जोहर (सती) केला.

चंदेरी हे बुंदेलखंडाच्या सीमेवरील मध्य प्रदेशातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. बादल महाल, कोशक महाल, किल्लाकोठी, सिंगपूर महाल, रामनगर महाल अशा राजपूत व मुघल शैलीतील अनेक इमारती येथे आहेत.

कोशक महालकोशक महाल : हा महाल अल्लाउद्दीन खिलजीने इ. स. १४४५मध्ये बांधला. तो चार भागांमध्ये बांधण्यात आला आहे. हा महाल अनेक रांगांतील खिडक्यांनी, तसेच छतावरील नक्षीकामाने भरलेला आहे.

चंदेरी किल्ला : बुंदेला राजपूतांनी हा किल्ला बांधला. ७१ मीटर उंचीवर असलेल्या या किल्ल्याला तीन दरवाजे असून, सगळ्यात वरील दरवाज्यास हवापूर दरवाजा असे म्हणतात.

चंदेरी किल्लाशहजादी का रोजा : माहीत नसलेल्या अनेक राजकुमारींचे हे स्मारक आहे. याच्या आतील भाग अतिशय सुंदरतेने नटलेला आहे.

जामा मशीद : मध्य प्रदेशातील ही एक मोठी मशीद आहे.

बूढी चंदेरी : दहाव्या शतकातील जैन मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. हजारो जैन बांधव येथे दर वर्षी येतात.
शहजादी का रोजा
म्युझियम : येथील संग्रहालयेही बघण्यासारखी आहेत. प्रत्येक गावात असलेल्या संग्रहालयात तेथील इतिहासाशी निगडित वस्तू पाहायला मिळतात.

गोलबावडी चंदेरी : नासिरुद्दीन खिलजीच्या काळात ही विहीर इ. स. १५०४मध्ये बांधण्यात आली. विहिरीत फारसी भाषेतील शिलालेख आहेत. येथी मुसा बावडीही बघण्यासारखी आहे. शहराच्या बाहेर कंधरगिरीच्या पायथ्याशी ही विहीर आहे.

परमेश्वर ताल : भूमंडला राजपूतांनी खास त्यांच्यासाठी हा तलाव बांधून घेतला. येथे राजपूत राजांची स्मारके आहेत. तसेच काठावर एक सुंदर मंदिरही आहे.

जामा मशीद
चंदेरीच्या आसपास

देवगड किला : चंदेरीपासून २५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून, इ. स. ९०० व इ. स. १००० या कालावधीतील अनेक जैन मंदिरे येथे आहेत. इ. स. ५००मधील विष्णू दशावतार मंदिरही येथे असून, सुबक मूर्ती व कलाकुसरीने मढलेले खांब हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

ईसागड : चंदेरीपासून ४५ किलोमीटर अंतरावर कडवाया गावात अनेक सुंदर मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर १०व्या शतकातील असून, कच्चपघहट्टा शैलीत हे बांधले आहे. तसेच चंदल मठ व एक भग्न बौद्ध मठही येथे आहे.

म्युझियमअशोकनगर : हे जिल्हा मुख्यालय असून, जैन लोकांची वस्ती असलेले ठिकाण आहे. येथे आकर्षक अशी जैन मंदिरे आहेत. महाभारतात या ठिकाणाचा उल्लेख आहे.

आनंदपूर : येथे एक सामाजिक कार्य करणारी परमहंस संप्रदायाची संस्था आहे. धर्मादाय दवाखानाही आहे. हे ठिकाण अशोकनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे.

गोलबावडी चंदेरीकडवाया : येथे एक गढी, प्राचीन शिवमंदिर आणि बीजसन माता मंदिर आहे.

थुम्बोजी सिद्ध क्षेत्र : हे जैनांचे एक तीर्थक्षेत्र आहे. ते अशोकनगरपासून ३२ किलोमीटरवर आहे.

कसे जायचे?
अशोकनगरपासून चंदेरी ६० किलोमीटर अंतरावर असून, झाशीपासून ते सुमारे १२५ किलोमीटरवर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन झाशी आणि जवळचा विमानतळ भोपाळ किंवा ग्वाल्हेर येथे आहे. राहण्याची चांगली व्यवस्था चंदेरी आणि अशोकनगर येथे होऊ शकते.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

बादल महाल

(चंदेरीची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Kamalsing R Patil About 214 Days ago
नवीन माहीती मिळाली सर खूप छान
0
0
Ramesh Atre About 271 Days ago
उत्कृष्ट माहिती व फोटो !
0
0
विशाखा अभ्यंकर About 328 Days ago
सुरेख वर्णन, थोडक्यात इतिहास व स्थळवर्णन. लेख व फोटोज खूपच छान. 'चंदेरी साडी' पुरतं माहीत होतं फक्त हे गाव.☺️
0
0
Jayshree Chandranil charekar About 340 Days ago
खूप छान सविस्तर माहिती दिली आहे
0
0
Sugandha Deshpande About 346 Days ago
खुप सुंदर
1
0
चंद्रकांत सोनजीराव लव्हेकर About 346 Days ago
माधवराव आपण खूपच चांगली माहिती दिलात तसेच हे इतिहासिक शहर आम्हास माहित नव्हते आता म प्र गेल्यावर मुद्दाम है शहर पाहूत आपण आमच्या माहिती त भर घातलात , धन्यवाद
1
0
Sudhir About 346 Days ago
Nice information and presentation
1
0

Select Language
Share Link