Next
‘अखंड घुंगरू नाद’मधून रोहिणी भाटे यांना आदरांजली
देशभरातील कलाकारांचा समावेश
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 12:55 PM
15 0 0
Share this story

रोहिणी भाटेपुणे : कथ्थक नृत्यासाठी आयुष्य वेचण्याबरोबरच त्या परंपरेचा धागा जपत या नृत्यप्रकारात सर्जनशील प्रयोग करणाऱ्या गुरू रोहिणी भाटे यांना त्यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी १४ व १५ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘अखंड घुंगरू नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नादरूप कथ्थक संस्था, महाराष्ट्र कल्चर सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र यांच्या वतीने हा आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असणार आहे. गुरू रोहिणी भाटे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कल्पनाशक्ती, सृजनशीलता व नृत्यनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांनी कथ्थककलेला खऱ्याअर्थाने भाषासौंदर्याची जोड दिली आणि कथ्थक नृत्यशैली सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवीत त्याला लोकमान्यता मिळवून दिली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

धीरेंद्र तिवारीभाटे यांनी केलेल्या कार्याला आदरांजली देण्यासाठी ‘अखंड घुंगरू नाद’चे आयोजन करण्यात आले आहे. यात १४ नोव्हेंबरला टिळक रस्त्यावर असलेल्या नादरूप संस्थेच्या कार्यालयात सलग बारा तास घुंगरू नाद करण्यात येईल. त्या दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊवाजेपर्यंत कथ्थक गुरू शमा भाटे, मनिषा साठे, भरतनाट्यम् नृत्यांगणा सुचेता भिडे-चापेकर व नादरूप संस्थेतील नृत्यांगना घुंगरू नाद करीत भाटे यांना आदरांजली वाहतील.     

रागिणी महाराज१५ नोव्हेंबरला हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी ७.३० दरम्यान कथ्थक नृत्याच्या माध्यमातून देशभरातील कथ्थकनर्तक व नृत्यांगना आपली नृत्यकला सादर करतील. या वेळी पंडित बिरजू महाराज यांची नात आणि कथ्थक नृत्यांगना रागिणी महाराज, जयपूरच्या मनीषा गुलयानी, बंगळूरूच्या कथ्थक नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका मधू नटराज आणि नंदिनी मेहता, जयपूर घराण्याच्या कथ्थक नृत्यांगना विधा लाल, पश्चिम बंगालचे नर्तक अशीमबंधू भट्टाचार्य, सौविक चक्रवर्ती, रायगड घराण्याच्या परंपरेतील अल्पना वाजपेयी यांबरोबरच जयपूर घरा गौरी दिवाकर, स्वाती सिन्हा, धीरेंद्र तिवारी आणि मधु नटराज हेही आपली नृत्यकला सादर करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, १४ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी नऊ ते रात्री नऊ
स्थळ : नादरूप कथ्थक संस्थेचे कार्यालय, टिळक रस्ता, पुणे.
दिवस : गुरुवार, १५ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी ७.३०
स्थळ : ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link