Next
डॉ. अनिल अवचट
BOI
Saturday, August 26, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

‘बाबा’ या प्रेमळ संबोधनानं जनमानसात प्रिय असणारे आणि सामाजिक कार्यात तन, मन, धन अर्पून काम करत असतानाच दुसरीकडे निसर्ग, प्राणिमात्र यांच्या संवर्धनासाठी तळमळीनं जनजागृती करणारे हरहुन्नरी अष्टपैलू लेखक डॉ. अनिल अवचट यांचा २६ ऑगस्ट हा जन्मदिवस. आज त्यानिमित्त ‘दिनमणी’मध्ये लोकांच्या लाडक्या ‘बाबा’ची ओळख....
..........................

डॉ. अनिल त्र्यंबक अवचट

२६ ऑगस्ट १९४४ रोजी पुणे जिल्ह्यातल्या ओतूरमध्ये जन्मलेले डॉ. अनिल अवचट हे चित्रकार, शिल्पकार, पत्रकार, समाजसेवक, ओरीगामीकार, बासरीवादक असे बहुविध पैलू असणारे अत्यंत लोकप्रिय लेखक. त्यांचं लेखन हे त्यांच्या गप्पिष्ट स्वभावासारखंच प्रवाही. ‘बाबा’ या प्रेमळ संबोधनानं ते समाजात प्रसिद्ध आहेत.

निसर्गाबद्दल, निसर्गातल्या अद्भुत चमत्काराबद्दल त्यांना अपार कुतूहल आणि तितकंच माणसांमधली माणसं शोधण्यात. त्यांचं सामाजिक कार्य तर अलौकिकच आणि त्यावर त्यांनी अत्यंत प्रेरणादायी लेखन केलं आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हे त्यांचं प्रचंड मोठं कार्य. याशिवाय त्यांनी भटके, मजूर, वेश्या अशा तळागाळातल्या लोकांसाठीही आवाज उठवण्याचं काम केलं आहे.

अवचट साध्या-सोप्या शब्दांत सुंदर तत्त्वज्ञान मांडतात. जगात जी सर्वत्र स्पर्धा दिसते त्या संदर्भात ते म्हणतात,‘प्रत्येक गोष्टीत नंबर वन आणि नंबर टू कशाला हवंय? निसर्गात हे असं कुठे असतं? गवताला जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महावृक्षाला आहे, आणि तेवढंच पाण्यात तरंगणाऱ्या शेवाळाला आहे. म्हणून ही स्पर्धा, उच्च-नीचता सोडून आपण विविधतेला स्वीकारायला हवं. तू असशील, पण मीही आहे. तुझी थोरवी मला दिसली पाहिजे, आणि त्याचबरोबर मी स्वतःला क्षुद्रही समजता कामा नये. ते ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे, ‘राजहंसाची चाल फार चांगली आहे; पण म्हणून मी चालूच नव्हे की काय?’ तर आपण ते चालणं विसरलो आहोत. आपण फक्त ती राजहंसाची चाल बघतो. फक्त प्रेक्षक झालो आहोत आपण’ ....त्यांनी काही सांगावं आणि आपण भान हरपून ऐकावं असा त्यांच्याशी बोलणाऱ्यांचा नेहमीचा अनुभव!

निसर्गाचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे हे सांगताना त्यांनी म्हटलंय, ‘सर्वांसहित जगणं, हेच मानवाला सोयीस्कर आहे. मला अध्यात्माची भाषा अवगत नाही; पण सर्वांमध्ये ब्रह्म आहे, देव आहे वगैरे आपण मान्य केलं आहे. त्यामुळे मानवाइतकच झाडं आणि प्राण्यांनाही जगण्याचा तितकाच अधिकार आहे. झाडं, प्राणी, पक्षी यांचा विनाश झाला, तर मानवी संस्कृतीचा विनाश अटळ आहे. इतर प्राणी कदाचित जगतील; पण मानव मात्र नामशेष होईल.’

त्यांना महाराष्ट्र राज्य वाङ्‌मय पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sunil Dhavale About 26 Days ago
श्रीमान अनिल अवचट यांनी वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आपण पंचाहत्तरी गाठली हे खरे वाटत नाही. मी आपणाला पाहिले नाही, पण अनेक पुस्तकातून, लेखातून आपण आ मचेशी बोलत असता आणि त्याचे आम्हाला गारूड होते. आपणाला भेटण्याची संधी मिळाली मी भाग्यवान
0
0
Sushma kulkarni About 26 Days ago
डाॕ.अनिल अवचट सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
0
0

Select Language
Share Link
 
Search