Next
सिंधुदुर्गात प्रथमच संघशिक्षा वर्ग
BOI
Tuesday, May 23, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

संतोष कदम यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कसालमधील संघशिक्षा वर्गाचा प्रारंभ झाला.कसाल (सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोकण प्रांताचा संघशिक्षा वर्ग २१ मेपासून कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सुरू झाला आहे. हा वर्ग चार जूनपर्यंत चालणार आहे. मुंबई ते गोवा परिसरातील १५९ स्वयंसेवक शिक्षार्थी म्हणून या वर्गात सहभागी झाले असून, अधिकारी, शिक्षक व व्यवस्था यांसह सुमारे ३०० जण या संघशिक्षा वर्गात सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्गात होत असलेला हा संघाचा पहिलाच वर्ग आहे. 

या वर्गाचा शुभारंभ संतोष कदम यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. या वेळी संस्था सचिव अवधूत मालणकर, विश्वस्त नवीन बांदेकर, रा. स्व. संघाचे कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठलराव कांबळे, संघशिक्षा वर्गाचे वर्गाधिकारी अॅड. गणेश धारगळकर, कार्यवाह अरुण गायकवाड, वर्गपालक सुमंत आमडोसकर आदी उपस्थित होते.

‘आपण राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, मातृभूमी प्रेम यांचा जागर करणारी माणसे आहात. कसालसारख्या भूमीला या सर्वांचा पदस्पर्श या होणे हे आमचे भाग्य आहे. पुढील २१ दिवस आपण राष्ट्र, धर्म, मातृभूमी प्रेमाचा तप येथे करणार आहात. यातून जी ऊर्जा निर्माण होणार आहे, ती या कसाल प्रशालेतील विद्यार्थ्यांना त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी पुढील अनेक वर्षे उपयोगी पडेल,’ असे प्रतिपादन येथील दी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी या वेळी  केले. विठ्ठलराव कांबळे यांनी प्रास्ताविकात संघ आणि संघाचे काम याबाबतची माहिती दिली.

या वर्गाचाच एक भाग म्हणून २४ मे रोजी सायंकाळी कसाल परिसरात सघोष पथसंचलन होणार आहे. तीन जून रोजी सायंकाळी या वर्गाचा जाहीर समारोप कसाल हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे आणि चार जून रोजी सकाळी दीक्षान्त कार्यक्रमानंतर हा वर्ग संपणार आहे. दर वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षण वर्ग संपूर्ण देशभर सुरू असतात. याही वर्षी हे प्रशिक्षण वर्ग सुरू असून, संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा संघशिक्षा वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search