Next
शहापूर येथील तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी
मिलिंद जाधव
Thursday, January 03, 2019 | 10:40 AM
15 0 0
Share this story



शहापूर : इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी, फिरणे या नियोजनात सर्वजण गुंतलेले असताना शहापूर कुणबी महोत्सव समिती, वासिंद येथील कुणबी प्रतिष्ठान व वासिंद विभागातील तरुणांनी मात्र गरिब व गरजूंवर मायेची ऊब पांघरत नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले आणि समाजासमोर एक आदर्श घालून दिला.

३१ डिसेंबरची संध्याकाळ म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची वेळ. यामध्ये प्रत्येकजण  आपापल्या तऱ्हेने नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतो. कुणी पार्ट्यांचे नियोजन करतात, तर कुणी बाहेर फिरायला जाण्याचे. आजची तरुण पिढी वेगवेगळ्या निमित्ताने पार्टीची संधी शोधत असते. मात्र त्याचवेळी दुसरीकडे संवेदनशील मने असलेली तरुण पिढी समाजाचा आणि समाजातील वंचितांचा विचार करण्यात गुंतलेली असते. म्हणूनच वंचितांसाठी काहीतरी करावे हा हेतूने झपाटलेल्या या संवेदनशील तरुण पिढीच्या हातून विधायक असे काहीतरी घडून जाते.



शहापूर कुणबी महोत्सव समिती, कुणबी प्रतिष्ठान आणि वासिंद विभाग यांनी २०१९ ची सुरुवात अशाच विधायक गोष्टीने केली आहे. रेल्वेस्टेशन, मार्केट, हॉस्पिटल, मंदिराबाहेर झोपणाऱ्या गरिबांचे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी त्यांना ब्लॅंकेटचे, तसेच बिस्किटांचे वाटप करण्यात आले. वासिंद, खडवली, टिटवाळा, आसनगाव आदी रेल्वेस्टेशन्स, शहापूर उपजिल्हा आरोग्य केंद्र या ठिकाणी जाऊन ही मोहिम राबविण्यात आली.



सध्या थंडीचे दिवस असल्याने हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. याची झळ गरिबांना बसत असली, तरी ते यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी असमर्थ आहेत, ही बाब हेरून वासिंद विभागातील तरुणांनी एकत्र येत हा उपक्रम राबविला. या उपक्रमात १३ युवक सहभागी झाले होते. या वेळी ३० गरजूंना मदत करण्यात आली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link