Next
नवले महाविद्यालयातर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर
प्रेस रिलीज
Wednesday, January 23, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. हे शिबिर मावळ तालुक्यातील गोवित्री ग्रामपंचायत येथे झाले.या शिबिरामध्ये दोन्ही महाविद्यालयांचे मिळून शंभरहून जास्त स्वयंसेवक सहभागी झाले होते. शिबिराग्राम सर्वेक्षण, ग्रामस्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, गावातील संपूर्ण ग्रामस्थांसाठी मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ वाटप उपक्रम, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या कर्तृत्वाविषयक व्याख्यानमाला, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, लोक जागृती अभियान, व्यसनमुक्ती व पर्यावरण रक्षण व संवर्धन यांविषयी पथनाट्ये, शालेय विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले.या शिबिरासाठी संकुलाचे संचालक डॉ. माणिक गायकवाड, एन. बी. नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद रोहकले यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एन. बी. नवले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सतीश सोनवणे व काशीबाई नवले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सुहास चव्हाण, एन. बी. नवले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी सुरज मानकर व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी कमलेश भवर यांचे मेहनत घेतली.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search