Next
काव्य सप्ताह २०१७चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Tuesday, December 26 | 01:20 PM
15 0 0
Share this story

पुणे : कवींनी कवींसाठी आयोजित केलेल्या आणि कविता प्रेमींचा वार्षिक आनंदोत्सव अशी ख्याती असलेल्या ‘काव्य सप्ताह २०१७’चे उद्घाटन २५ डिसेंबर रोजी ‘रसिक मित्र मंडळा’चे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला, ‘प्रबोधन माध्यम’चे संस्थापक दीपक बीडकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे संयोजक ज्येष्ठ कवी रमेश गोविंद वैद्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विश्वास वैद्य यांच्या चित्रप्रदर्शनाचे उ्दघाटन या वेळी करण्यात आले. काव्य सप्ताह उपक्रमाचे हे १८वे वर्ष आहे.

पहिल्या दिवशी ‘कोवळ्या उन्हात, मोकळ्या रानात’ हे कवी संमेलन पार पडले. डॉ. गौरी दामले, आनंद कुलकर्णी, दीपाली दातार, शिवाजी बोराडे, विजय सातपुते यांच्यासह अनेक कवींनी कविता सादर केल्या. ३१ डिसेंबरपर्यंत हा काव्यसप्ताह दररोज सायंकाळी सदाशिव पेठेतील स्काऊट हॉल येथे साजरा होणार आहे.



 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link