Next
मोहन आपटे, विलास वसंत खोले
BOI
Tuesday, December 05 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘मला उत्तर हवंय!’ या आपल्या लोकप्रिय पुस्तकशृंखलेतून अवकाश, गणित, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, पर्यावरण, संगणक, अणुशक्ती अशा अनेकविध विषयांची माहिती अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत करून देणारे प्राध्यापक मोहन आपटे यांचा आणि प्रख्यात समीक्षक विलास खोले यांचा पाच डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.....
.........
मोहन आपटे

पाच डिसेंबर १९३८ रोजी जन्मलेले मोहन आपटे हे प्रामुख्याने खगोलशास्त्रीय लेखन करणारे भौतिकशास्त्राचे प्रोफेसर म्हणून प्रसिद्ध आहेत. 

मुलांना खगोलशास्त्राची आवड लागावी यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी दुर्बिणीच्या साह्याने आकाशदर्शन घडवून मुलांना आणि पालकांना ग्रह, तारे, दीर्घिका आणि अंतराळाची माहिती दिली आहे. त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार आणि भास्कराचार्य पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

भविष्यवेध, संगणक, इंटरनेट, यंत्रमानव, डावखुऱ्यांची दुनिया, Elementary Astronomical Calculations, गणितशिरोमणी भास्कराचार्य, हा खेळ सावल्यांचा!, मला उत्तर हवंय! : गणित भाग १ आणि २, मला उत्तर हवंय! : पृथ्वीविज्ञान, शालेय खगोलशास्त्र, शरीरविज्ञान भविष्यवेध, स्पेस शटल, विज्ञानवेध, याला ‘जीवन’ ऐसे नाव!, अणुबाँबची कहाणी, आपली पृथ्वी, आर्यभटीय, अवकाशातील भ्रमंती : भाग १ ते ३, भविष्यवेध तंत्रज्ञान, अवकाश, युद्धशास्त्र, ब्रह्मांड, चला अंतरिक्षात, चंद्रलोक, चंद्रप्रवासाची दैनंदिनी, गणकचक्रचूडामणि भास्कर, गणिताच्या पाऊलखुणा, इंटरनेट : एक कल्पवृक्ष, कालगणना, कृष्णविवर, मला उत्तर हवंय! : खगोलशास्त्र, मला उत्तर हवंय! : पदार्थविज्ञान, नभ आक्रमिले, निसर्गाचे गणित, पाटणदेवी शिलालेख, प्राचीन भारतीय गणित भाग १ आणि २, संख्यांचे गहिरे रंग, सापेक्षतेचे शतक, शतक शोधाचे, सूर्यग्रहण अशी त्यांची अनेक पुस्तकं वाचकप्रिय आहेत.

(मोहन आपटे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

.......
विलास वसंत खोले

पाच डिसेंबर १९४४ रोजी जन्मलेले विलास खोले हे चांगले समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शोधक दृष्टीनं आणि अत्यंत रसिकतेनं केलेलं अमेरिकावारीचं प्रवासवर्णन अत्यंत सुंदर आणि प्रभावी झालं आहे. ‘शोध’ या संस्थेचे ते संस्थापक आहेत. ‘शोकांतिकेची संकल्पना व काही मराठी नाटके’ या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली आहे. 

त्यांना २०१६ सालचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

महर्षी धोंडो केशव कर्वे, रमाबाई महादेवराव रानडे व्यक्तित्व आणि कर्तृत्व, वा. म. जोशी जीवनदृष्टी आणि साहित्यविचार, सूर्यबिंबाचा शोध, अध्यात्म आणि विज्ञान (संपादित), संत नामदेव आणि सांस्कृतिक प्रबोधन, बाप ज्ञानेश्वर समाधिस्त, सुहृदगान, विलोकन, आज्ञापत्र, भक्तीशोभा, गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी  अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(विलास खोले यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link