Next
‘रुबिक’ची ‘आयआयसीआय’सोबत भागीदारी
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 03:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : रुबिक या व्यक्ती तसेच छोट्या-मध्यम उद्योगांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तंत्रज्ञान-सक्षम एंड टू एंड सोल्युशन्स पुरवणाऱ्या वन-स्टॉप ऑनलाइन क्रेडिट मार्केटप्लेसने विमा क्षेत्रातील सेवांचा विस्तार करत, देशातील सर्वांत मोठ्या खासगी विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे.

या भागीदारीमुळे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलच्या पॉलिसीज रुबिकच्या वित्तीय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. हा एक मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म असून, ग्राहकांची माहिती व गरजा यांना सुसंगत अशी उत्पादने यावरून पुरवली जातात. रुबिकद्वारे सध्या दिल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये विमा उत्पादने चपखल बसतात. विशेषत: सध्याच्या ग्राहकवर्गासाठी. सध्या रुबिकमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्ज व क्रेडिट कार्डांमध्ये विमा उत्पादनांची भर पडल्याने रुबिकची सेवा अधिक विकसित झाली असून, ग्राहकांना आणखी अखंडित असा अनुभव यामुळे मिळेल.

‘एसपीओटी’ प्लॅटफॉर्मवरील अंगभूत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून, ग्राहकांच्या प्रोफाइल्समधील माहिती आणि विमा कंपनीच्या पॉलिसीज यांची जुळणी करून सुसंगत उत्पादने ग्राहकांना सुचवली जातील. पेपरलेस फोकस्ड फीचर इंटिग्रेशनच्या मदतीने रुबिकचा प्लॅटफॉर्म ग्राहकांना विमा उत्पादनांबाबत रिअल-टाइम निर्णय घेण्याची मुभा देतो.

रुबिकचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मानव जीत या भागीदारीबद्दल म्हणाले, ‘विमा पॉलिसी विकत घेणे हा अगदी काही आठवड्यांपासून महिन्यांपर्यंत वेळ घेणारा वेळखाऊ निर्णय ठरतो. एखाद्या विशिष्ट योजनेपासून अपेक्षित लाभांची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक असते. रुबिकचे अनोखे एकात्मीकरण तंत्रज्ञान तसेच एंड टू एंड फुलफिलमेंट मॉडेल ग्राहकांना जलद, सुलभ आणि अखंड आर्थिक सल्ला मिळेल याची खात्री देते. ग्राहकांना अधिक प्रगत आणि एकत्रित अनुभव देण्यासाठी आम्ही या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्ससोबत भागीदारी केली आहे. यामुळे गुंतागुंतीच्या आर्थिक प्रक्रियांचे सुलभीकरण आणि आर्थिक समावेशनाच्या आमच्या प्रयत्नांना चालना मिळेल.’

व्यक्ती तसेच छोट्या उद्योगांच्या विमाविषयक गरजा सहज पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांना पॉलिसी सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून एंड टू एंड फुलफिलमेंट धोरण ठेवणारा रुबिक हा प्लॅटफॉर्म विमा पॉलिसींचे अनेकविध पर्याय ग्राहकांपुढे ठेवतो. यामध्ये आरोग्यविमा, पर्यटनविमा, वाहनविमा, दुचाकीविमा, मुदतीचा विमा, मालमत्ता तसेच घरासाठी विमा, गंभीर आजार व अपघातांसाठी संरक्षण देणारा विमा, छोट्या-मध्यम उद्योगांसाठी विमा आणि आयुर्विमा यांसारख्या अनेक उत्पादनांचा समावेश आहे. विम्याविषयीच्या सर्व प्रकारच्या गरजा रुबिक एका प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण करू शकते.

‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल’चे कार्यकारी संचालक पुनीत नंदा म्हणाले, ‘दमदार तंत्रज्ञानात्मक प्लॅटफॉर्म असलेल्या रुबिकसोबत भागीदारी झाल्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आयुर्विमा सर्वांपर्यंत पोहोचण्यामध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावू शकतो यावर आमचा विश्वास आहे. तंत्रज्ञानाचा एक सशक्त प्लॅटफॉर्म आणि ग्राहककेंद्री उत्पादने हे एकत्र आल्यामुळे ग्राहकांसाठी निर्णय घेणे सोपे होणार आहे. आमची बहुमार्गी वितरण रचना अधिक भक्कम करण्याच्या धोरणाशी सुसंगत अशी ही भागीदारी आहे.’

तंत्रज्ञानाबाबत असाच दृष्टिकोन असलेल्या आणखी काही मोठ्या विमा कंपन्यांसोबतही रुबिकने भागीदारी केली आहे. यामध्ये बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, टाटा एआयजी जनरल या काही कंपन्यांचा समावेश असून, त्यांची उत्पादने रुबिकमार्फत उपलब्ध करून दिली जातात. सध्या कंपनीने एक लाख अर्जांवर प्रक्रिया केली असून, दोन हजार ५०० कोटी रुपये मूल्याची कर्जे दिली आहेत आणि ९०हून अधिक वित्तीय कंपन्यांमधून ७५ हजार कार्डे साइन अप केली आहेत.

रुबिकविषयी :

रुबिक हा अग्रगण्य वित्तीय ऑनलाइन मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म २०१४ साली स्थापन झाला. प्रत्येकाची आर्थिक आकांक्षा सर्वांत सोप्या, सर्वांत छोट्या व सर्वांत जलद मार्गाने, कर्जे, क्रेडिट कार्डे व विमा उत्पादनांच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या उद्देशाने रुबिकची स्थापना करण्यात आली.  एआयवर आधारित शिफारशींच्या इंजिनवर विकसित करण्यात आलेल्या रुबिकच्या ऑनलाइन क्रेडिट मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मचे वित्तीय संस्थांच्या प्रणालींशी एकात्मीकरण करण्यात आले असून, यामुळे रिअल-टाइम प्रक्रिया करणे व ग्राहकांना ऑनलाइन मंजुरी देणे शक्य होते. ग्राहकांपासून ते वित्तीय संस्थांच्या कामकाजावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांपर्यंत संपूर्ण कर्ज प्रक्रियेला आवश्यक अशी तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्स रुबिक पुरवते.

एक आदानप्रदान प्लॅटफॉर्म (बीटूसी) म्हणून रुबिक वित्तीय संस्थांची अनेकविध उत्पादने/पॉलिसी एकत्रित करते. त्यामुळे ग्राहक ज्याच्या शोधात असतात, ते त्यांना सापडू शकते. त्याचप्रमाणे एक मेकर प्लॅटफॉर्म (बीटूबी) म्हणून रुबिक अन्य संबंधितांसाठी तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्स विकसित करते. यामध्ये आमच्या सहयोगींना वित्तीय उद्योजक होण्याची क्षमता देणारी मोबाइल अॅप्स/एसपीओटी पुरवले जातात, छोट्या व मध्यम उद्योगांसाठी कर्जे मिळवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून टीएबी सोल्युशन्स पुरवली जातात, वित्तीय संस्थांसाठी व्हाइट टेबल सोल्युशन्स पुरवली जातात. एक फिजिटल (प्रत्यक्ष व डिजिटल यांचे मिश्रण असलेला) दृष्टिकोन ठेवून रुबिक संपूर्ण परिसंस्थेच्या (इकोसिस्टम) गरजा समजून घेत आहे आणि एक वित्तीय मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून काम करत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link