Next
पुणे कँटोन्मेंटचे प्रश्न सोडविण्यासाठी शिरोळेंचा पुढाकार
प्रेस रिलीज
Tuesday, November 13, 2018 | 02:58 PM
15 0 0
Share this article:

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे आणि खडकी कँटोन्मेंट विभागाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रित समितीसोबत पुण्यात यासंदर्भात १२ नोव्हेंबर २०१८ रोजी एक बैठक झाली. यात या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्याचे निराकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली  

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सुमीत बोस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीची नेमणूक केली आहे. पुण्यात झालेल्या बैठकीवेळी खासदार सुमीत बोस, अनिल शिरोळे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे, डॉ, मधुमिता रॉय, राकेश मित्तल, रविकांत चोपरा, ले. जन. अमित शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.

या विषयी अधिक माहिती देताना खासदार शिरोळे म्हणाले, ‘कँटोन्मेंट विभागाचे अनेक प्रश्न आहेत. यामध्ये कँटोन्मेंटचे स्थलांतर, वाढीव एफएसआय व करप्रणाली यासंदर्भातील नागरिकांचे प्रश्न लक्षात घेत मी वेळोवेळी पाठपुरावा करीत होतो. देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी या संदर्भात पत्रव्यवहार देखील झाला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सीतारमन यांनी सर्व कँटोन्मेंटच्या प्रश्नांसंदर्भात देशभरातील ६२ कँटोन्मेंटचे उपाध्यक्ष व त्या भागातील खासदार यांची काही महिन्यांपूर्वी दिल्लीत बैठक घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने माजी महसूल सचिव सुमीत बोस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीची स्थापना करण्यात आली. ही समितीचे शिष्टमंडळ सध्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भेटीसाठी आली आहे.’

‘या भेटीत मुख्यत: पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या स्थलांतराचा मुद्दा चर्चिला गेला. ज्या वेळी कँटोन्मेंट बोर्डांच्या हद्दी ठरविण्यात आल्या त्या वेळी शहरांचा विस्तार झाला नव्हता. आजचा आणि नजीकच्या भविष्याचा विचार केला, तर आता कँटोन्मेंट बोर्ड हे शहराच्याच हद्दीत येत आहेत. त्यामुळे शहराच्या हद्दीत येऊनही कँटोन्मेंट बोर्डच्या नियमांनुसार नागरिकांना काही योजनांच्या लाभ घेता येत नाही. त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी कँटोन्मेंट बोर्डाला शहराबाहेर स्वतंत्र जागा देत त्यांचे स्थलांतर करावे असे मी सुचविले,’ अशी माहिती खासदार शिरोळे यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search