Next
‘सूर्यदत्ता’मध्ये ‘अमेरिकेतील शिक्षण व व्हिसा प्रक्रिया’वर मार्गदर्शन
‘इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स’चा पुढाकार
प्रेस रिलीज
Saturday, April 13, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमेरिकेतील शिक्षण व व्हिसा प्रक्रिया’वर विनामूल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. ‘सूर्यदत्ता नॉलेज मॅनेजमेंट एज्यु-सोसियो कनेक्ट’अंतर्गत अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित १६ एप्रिल २०१९ रोजी दुपारी २.३० ते चार या वेळेत संस्थेच्या बावधन कॅम्पसमधील बन्सी रत्न सभागृहात होणार आहे.

जागतिक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट्स विद्यार्थ्यांना मिळाव्यात, यासाठी ‘सूर्यदत्ता’तर्फे विद्यार्थ्यांना विदेशात शिकण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गेल्या अनेक वर्षांत अमेरिका हे उच्च शिक्षणासाठी आवडते ठिकाण म्हणून विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले आहे. त्यामुळे अमेरिकेतील शिक्षणाची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटने इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीने काम सुरू केले आहे.

बारावीच्या पुढील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन सत्र विनामूल्य खुले आहे. ‘सूर्यदत्ता’सह इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घ्यायला हवा. ‘यूएस’मध्ये शिक्षण आणि व्हिसा अर्ज प्रक्रिया याविषयी मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी योग्य महाविद्यालय निवड, शैक्षणिक खर्च आणि व्हिसा अर्ज प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले करणार आहे.

मार्गदर्शन शिबिराविषयी :
दिवस :
मंगळवार, १६ एप्रिल २०१९
वेळ : दुपारी २.३० ते सायंकाळी चार  
स्थळ : बन्सी रत्न सभागृह, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बावधन कॅम्पस.
अधिक माहितीसाठी संपर्क : इंडो-अमेरिकन चेम्बर ऑफ कॉमर्सचे सुधीर रेड्डी- ९०२८७ १०९००, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या जनसंपर्क संचालक कॅप्टन शालिनी नायर- ९११२२ ९७६०२.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search