Next
डेरवण येथे ‘वुमन्स वेल बिइंग’ शिबिराचे आयोजन
फिनोलेक्स इंडस्ट्रीज-मुकुल माधव फाउंडेशनचा पुढाकार
BOI
Tuesday, February 26, 2019 | 03:16 PM
15 0 0
Share this article:

चिपळूण : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन आणि वालावलकर हॉस्पिटल यांच्या सहयोगाने ‘वुमन्स वेल बिइंग’ शिबिराचे आयोजन एक ते १५ मार्च २०१९ या कालावधीत (सोमवार वगळून) करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी नऊ ते दुपारी ४.३० या वेळेत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात होईल.

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असून, याचे प्राथमिक स्तरावरच निदान होणे अवघड असते. समाजामध्ये जागरूकता नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होते. मॅमोग्राफीमध्ये अत्यल्प क्ष किरणांचा वापर करून स्तनांच्या कर्करोगाचे निदान आणि तपासणी केली जाते. वेळेत निदान झाल्यामुळे त्याचे निवारण करण्यासही मदत होते. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा.

या शिबिराचे दर फिनोलेक्स कंपनीतर्फे अनुदानित करण्यात आले आहेत. यामध्ये सोनो मॅमोग्राफी, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, सीबीसी, ब्लड शुगर, युरिन, ब्रेस्ट क्लिनिकल एक्जामिनेशन बाय लेडी गायनॅकोलॉजिस्ट, फिजिशियन कन्सल्टेशन, गायनॅकोलॉजिकल कन्सल्टेशन फिजिओथेरपि कन्सल्टेशन, डायट कन्सल्टेशन, कॉल्पोस्कोपी आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. या तपासण्यांची किंमत सुमारे दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे; मात्र या शिबिरात या ही सेवा रुग्णांना केवळ १०० रुपयांत दिली जाणार असून, उर्वरित रक्कम ‘फिनोलेक्स’ देणार आहे.

पूर्वनोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी चिपळूण आणि रत्नागिरी येथे बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयत्या वेळी येणार्‍या उमेदवारांनाही सल्ला व समुपदेशनाची सुविधा दिली जाईल, असे ‘फिनोलेक्स’ व ‘मुकुल माधव’तर्फे सांगण्यात आले आहे.

शिबिराविषयी :
दिवस :
एक ते १५ मार्च २०१९
वेळ : सकाळी नऊ ते दुपारी ४.३०
स्थळ : वालावलकर रुग्णालय, डेरवण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.
नाव नोंदणीसाठी संपर्क :
अभिषेक साळवी : ९०४९९ ६४६००, ९८५०९ ८०४३७
डॉ. आसावरी मोडक : ९१३०६ ४७६६९, ८४४६३ ७७५१५.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search