Next
‘महाराष्ट्र दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’
आमदार हेमंत टकले यांची राज्य सरकारकडे मागणी
प्रेस रिलीज
Friday, March 01, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘राज्य सरकारने महाराष्ट्र दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा,’ अशी मागणी विधानपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले यांनी केली.

‘गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक पाऊले उचलण्यात आली, मात्र आजवर तोडगा निघालेला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी विरोधी पक्ष सरकारसोबत आहेत,’ असेही आमदार हेमंत टकले यांनी सांगितले.

‘दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा मराठी भाषेचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही,’ असेही ते म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link