Next
मनिंदरजीतसिंग बिट्टा यांच्यावर बनणार चित्रपट
निर्माते शैलेंद्रसिंग आणि प्रिया गुप्ता यांची घोषणा
BOI
Wednesday, May 29, 2019 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

शैलेंद्रसिंग, मनिंदरजीत सिंग बिट्टा आणि प्रिया गुप्ता

मुंबई :  पंजाबमध्ये दहशतवादाने थैमान घातलेल्या काळात दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेले आणि दोन वेळा बॉम्ब हल्ल्यातून वाचलेले मनिंदरजीत सिंग बिट्टा अर्थात एम. एस. बिट्टा यांचा रोमांचकारी जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. लेखक, स्टोरी टेलर व निर्माते शैलेंद्रसिंग आणि प्रिया गुप्ता हे ‘जिंदा शाहिद’ या नावाने त्यांच्यावर चित्रपट बनवणार आहेत. 

नुकताच त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन या चित्रपटाचा श्री गणेश केला. ‘एम. एस. बिट्टा ही एक जिवंत कथाच आहे. या सच्च्या देशभक्ताची कथा देशभरातील युवकांना प्रेरणा देईल. बिट्टा यांनी आम्हाला हा चित्रपट करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २०२० च्या सुरुवातीला सुरू होणार असून, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल. हा चित्रपट बॉलीवूडसाठी नक्कीच गेमचेंजर ठरेल,’ असे शैलेंद्रसिंग यांनी सांगितले. 


मनिंदरजीत सिंग बिट्टा दहशतवादाविरोधात लढा देणारे पंजाबमधील एक धडाडीचे नेतृत्व. दहशतवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता त्यांनी १९८३ मध्ये सुवर्णमंदिरावर भारतीय ध्वज फडकवला. तेंव्हापासून ते खलिस्तानवादी दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आले. दिल्लीत कॉंग्रेस युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना, त्यांच्यावर जीवघेणे दोन बॉम्बहल्ले झाले. एका बॉम्ब हल्ल्यात त्यांनी आपला डावा पाय गमावला. पंजाबचे मुख्यमंत्री बिअंतसिंग यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही होते. २००१ च्या सुमारास ते राजकारणातून निवृत्त झाले. ते दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या, शहीद जवनांच्या कुटुबांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटची स्थापना केली आहे. 

अशा या धाडसी व्यक्तीच्या प्रेरणादायी कथेमुळे युवा पिढीत चेतना निर्माण होईल, अशी अपेक्षा निर्माते शैलेंद्र सिंग आणि प्रिया गुप्ता यांना आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search