Next
डॉ. गंगाधर पानतावणे
BOI
Thursday, June 28 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रसिद्ध विचारवंत साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचा २८ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....
२८ जून १९३७ रोजी नागपूरमध्ये जन्मलेले डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे हे समीक्षक, संपादक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. दलित साहित्याचे मुखपत्र असलेल्या अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम पाहिलं होतं. 

सॅन होजेमध्ये भरलेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना फाय फाउंडेशन पुरस्कार, राज्य शासन पुरस्कार, आचार्य अत्रे समीक्षा पुरस्कार, मूकनायक पुरस्कार, डॉ. भालचंद्र फडके पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता, साहित्य निर्मिती : चर्चा आणि चिकित्सा, साहित्य : प्रकृती आणि प्रवृत्ती, अर्थ आणि अन्वयार्थ, चैत्य, दलित वैचारिक वाङ्मय, दुसऱ्या पिढीचे मनोगत, धम्मचर्चा, मूल्यवेध, लेणी, लोकरंग, वादळाचे वंशज, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, स्मृतिशेष, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२७ मार्च २०१८ रोजी त्यांचं औरंगाबादमध्ये निधन झालं.

(गंगाधर पानतावणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link