Next
‘साई सत्चरित्र’ नाट्यप्रयोग सादर
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 02:35 PM
15 0 0
Share this story


पुणे : पुण्यातील ‘विश्व जागृती मिशन ट्रस्ट’च्या पुण्यधाम आश्रमामध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या शिकवणुकीवर आधारित ‘साई सत्चरित्र’ या हिंदी भाषेतील ध्वनि-प्रकाश नाट्याचा प्रयोग नुकताच आयोजित करण्यात आला. ‘रामनवमीचा पवित्र मुहूर्त साधून, तसेच आश्रमात नुकत्याच उद्घाटन झालेल्या तेजस्वी साई मंदिराबाबत घोषणा करण्याचे औचित्य साधून, आम्ही हा नाट्यप्रयोग आश्रमात आयोजित करण्याचे ठरवले,’ असे आश्रमाच्या अध्यक्ष माँ कृष्णा कश्यप यांनी सांगितले.
 
लोकप्रिय चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेते मुकुल नाग यांनी या नाट्याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. दशकभरापूर्वी रामानंद सागर यांनी निर्मिती केलेल्या आणि स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या ‘सबका मालिक एक है’ या मालिकेत मुकुल नाग यांनी साईबाबांची प्रमुख भूमिका केली होती.
 
साईबाबांना जात, वंश, धर्म यांच्या पलिकडे जाऊन, समाजातील सर्व स्तरांतील भक्तगण लाभले आहेत. या नाटकालाही शेकडो साईभक्त उत्सुकतेने उपस्थित होते.
 
विश्व जागृती मिशन ट्रस्ट, पुणे ही विना-नफा संघटना असून, तिच्यातर्फे पुण्यधाम आश्रम चालवला जातो. हा आश्रम म्हणजे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचे सुंदर व शांत परिसरातील घर आहे. आश्रमाच्या परिसरात श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, कैलास शिखर, नवे तेजस्वी साई मंदिर, देशी वाणाच्या गायींची गोशाळा, ग्रंथालय, वाचनकक्ष आहे. याखेरीज येथे एकाच वेळी तीन हजार लोकांना सामावून घेणारे व सामाजिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरले जाणारे ‘कृष्ण अवतार सांस्कृतिक भवन’ही आहे.
 
मुकुल नाग, माँ कृष्णा कश्यपपुण्यधाम आश्रम अनेक सामाजिक कल्याण उपक्रमही राबवतो. नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या कुटुंबाचे पुनर्वसन, महाराष्ट्रातील बंडखोर प्रभावित भागांतील पात्र मुलींच्या शिक्षणाचे प्रायोजन, गरीब व वंचित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील उपवर मुला-मुलींसाठी सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, येरवडा तुरुंगातील महिला कैद्यांसाठी वैद्यकीय शिबिरे व प्रेरणात्मक कार्यक्रमांचे आयोजन, अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link