Next
‘कोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापन होणार’
प्रेस रिलीज
Wednesday, July 11, 2018 | 02:04 PM
15 0 0
Share this article:

नागपूर : ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये मत्स्य विद्यापीठ झालेच पाहिजे,’ अशी आग्रही मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली. कोकणाचे मत्स्य कॉलेज नागपूर मत्स्य विद्यापीठामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आमदार जाधव यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सरकारने कोकणात स्वतंत्र विद्यापीठ होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

१० जुलै रोजी सभागृहामध्ये पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये मत्स्यविभागाच्या विषयावर आमदार जाधव यांनी विचार मांडले आणि कोकणासाठी मत्स्य विद्यापीठ मिळावे, अशी मागणी लावून धरली. सभागृहात मांडलेल्या या प्रश्नानंतर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भास्कर जाधव‘कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. मोठयाप्रमाणात मत्स्य व्यवसाय होते. परकीय चलन राज्याला देशाला कोकणातून मिळते; परंतु नागपूरला जे पशु आणि मत्स्य विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये कोकणचे मत्स्य कॉलेज समाविष्ट करायचे अशाप्रकारचा विचार साधारणपणे मंत्र्यांकडून मांडण्यात आला. त्यावेळी आम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये मत्स्य विदयापीठ झालेच पाहिजे. ही आग्रही मागणी आम्ही मांडत असताना ते का झाले पाहिजे हेसुद्धा अभ्यासपूर्ण सांगितले,’ असे जाधव यांनी सांगितले.

‘त्यावेळी सभागृहामध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, भाजप या पक्षाच्या लोकांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि सरकारला असे सांगितले की, कोकणामध्ये स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ स्थापन करायचे असेल, तर याच अधिवेशनामध्ये एखादे बिल घेऊन या, विधेयक घेऊन या. आम्ही सभागृहामध्ये एकमुखाने त्याला पाठिंबा देऊ. माझ्या दृष्टीने हा कोकणाच्या इतिहासामधील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. गेली अनेक वर्ष अनेक मंडळी मत्स्य विद्यापीठ कोकणात व्हावे यासाठी प्रयत्न करत होते. त्याला आज खऱ्या अर्थाने सकारात्मक उत्तर सरकारने दिले आहे,’ असेही भास्कर जाधव या वेळी म्हणाले.

‘विदर्भातील विद्यापीठ विदर्भात राहिले आणि कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ करण्याचा मानस आणि तशाप्रकारची भूमिका सरकारच्यावतीने मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे,’ अशी माहितीही आमदार जाधव यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search