पुणे : येथील ‘भारती निवास सोसायटी’च्या बालरंजन केंद्राच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन बुधवार, २३ जानेवारीला करण्यात आले आहे. बालरंजन केंद्राचा हा ३१वा वर्धापनदिन असणार आहे.
बुधवारी (२३ जानेवारी) सायंकाळी पाच ते सात या वेळेत भारती निवास सोसायटीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. विचारवंत, लेखक दत्ता कोहिनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, तर डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

गेली ३१ वर्षे विविध उपक्रमांद्वारे मुलांना घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या या बालरंजन केंद्रातील मुले वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने विविध प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन बालरंजन केंद्राच्या संचालिका आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले आहे.