Next
‘पिजन’तर्फे ‘दी ग्रेट २०१९ सेल’ सुरू
प्रेस रिलीज
Thursday, December 27, 2018 | 04:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : स्वयंपाकघरातील उत्पादनांमध्ये अग्रेसर असलेल्या ‘पिजन’ या ब्रॅंडच्या वतीने किचन उत्पादने व कन्झ्युमर एलईडी लायटिंग सोल्यूशन्ससाठी केवळ दोन हजार १९ रुपयांच्या उत्पादनांचा कॉम्बो सेल जाहीर केला आहे.

‘पिजन’च्या २०१९ या ‘न्यू इअर स्पेशल सेल’मध्ये अनेक उत्पादनांवर सवलती आकारण्यात आल्या असून, ग्राहकांच्या किचनला नवा लूक देण्याची संधी कंपनीने दिली आहे. हा सेल ३१ डिसेंबर र्यंत सुरू राहणार आहे.

‘स्टोव्हक्राफ्ट’च्या संचालिका नेहा गांधी म्हणाल्या, ‘नवी सुरुवात करण्यासाठी नववर्ष हे चांगले निमित्त असते. याच काळात आपल्या घरात आणि किचनमध्ये नव्याची भर घालायला ही एक चांगली संधी आहे. ग्राहकांना नवीन वर्षाचे स्वागत अधिक जल्लोषात, आनंदात करता यावे, यासाठी आमचा दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेला ‘न्यू इअर स्पेशल सेल’ आम्ही सादर करत आहोत. कूकवेअर, किचन अप्लायन्सेस, एलईडी लायटिंग सोल्यूशन्स या आमच्या सर्वच उत्पादनांच्या दरात या सेलमध्ये भरघोस सवलती देत असून, ग्राहकांना आपल्या किचनचे रूप बदलण्यासाठी याहून चांगली संधी मिळूच शकणार नाही.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link