Next
आयुष्याची गोळाबेरीज
BOI
Friday, September 21, 2018 | 02:04 PM
15 0 0
Share this article:

‘आयुष्याची गोळाबेरीज’ हे ग. ना. केळकर यांचे पुस्तक दोन भागांत आहे. पहिल्या भागात त्यांचे आत्मचरित्र आहे. त्यांनी आयुष्यभर ठेवलेल्या अनेक नोंदींवर ते आधारित आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
.......
ग. ना. केळकर यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले आश्चर्यकारक प्रसंग, योगायोगाने जुळून आलेल्या घटना, दैवी कृपेने टळलेले दुर्धर प्रसंग अशा सर्व हकिकतींचा ‘आयुष्याची गोळाबेरीज’ या पुस्तकात प्रसंगानुरूप आढावा घेतला आहे. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतः ठरवलेल्या व मनात आणलेल्या उद्दिष्टांसाठी खूप प्रयत्न करूनही यश मिळू शकले नाही; परंतु दैवदत्त आलेल्या संधींना प्रामाणिकपणे कष्ट करून सामोरे गेल्यामुळे पूर्वीचे उद्देश अनेक पटीने सफल झाल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटते. त्यामुळे त्यांची अशी धारणा झाली की, आपल्या समोर येणाऱ्या परिस्थितीचे व संधींचे आपली आवड-निवड न ठेवता स्वागत केल्यास जीवन यशस्वी होते.

लहापणापासूनच चांगले संस्कार असल्यामुळे त्यांचा आध्यात्मिक विषयांकडे ओढा होताच. पुढे गुरुप्राप्तीसाठी वेगवेगळे प्रयत्न व प्रवास करून ते मुक्कामी पोचले. त्या प्रवासात देखील त्यांना सतत दैवी मदत होतीच. अनेक मेधावी, विद्वान व सत्पुरुषांच्या गाठी-भेटी व सहवासाचा सतत लाभ मिळत गेला, वेगवेळ्या संप्रदायांची अनुभव मिळाला. सद्गुरूकृपातर आवश्यक आहेच. पण नंतर नंतर केवळ गुरुतत्वच आपल्याला वेगवेगळ्या रूपाने सहाय्यरूप होत राहाते, हाच त्यांचा निष्कर्ष आहे.

दुसऱ्या भागात त्यांनी दिलेल्या प्रवचनांचा संक्षेपाने वृत्तांत आहे. मुळात वैज्ञानिक संस्थेत नोकरी असूनही निव्वळ सद्गुरूंनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे व आज्ञेमुळे ही प्रवचने होऊ शकली. त्या प्रवचनांच्या विषयामध्ये ज्येष्ठ अवतारी पुरुषांचे चरित्र, कर्म, ज्ञान, भक्ती, योग हे सर्व प्रातिनिधिक स्वरूपांत समाविष्ट आहेत. काही विषयावर स्वतंत्र अभ्यास करूनही लिखाण झाले आहे. ते मुळातच वाचायला हवे.

पुस्तकाला संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांची प्रस्तावना लाभलेली आहे व रामदासी संप्रदायाचे सुनील चिंचोलकर यांचे आशीर्वाद लाभले आहेत. प्रस्तावनेत डॉ. कामत लिहितात, ‘एका वैज्ञानिकाने मागे वळून पाहात, आपले जीवनयात्रेचे वाचनीय निवेदन करीत, आपल्याला पुढे कसे जाता येईल त्यासाठी आपली श्रीशिल्लक ठेवलेली आहे.’ प्रारब्धाप्रमाणे समोर येईल त्याला विरोध न करता शरणागत स्थितीमध्ये जर भाग घेतला, तर संघर्ष टाळून समाधानाने जगता येते. हे परमार्थप्रीतीतून मिळालेले खरे पाथेय म्हणता येईल. गुरुकृपेतून वेळोवेळी प्राप्त झालेली अद्भुत अवस्था निवेदिली आहे. ती अत्यंत चिंतनीय आहे. एका प्रचीतीसंपन्न ग्रंथकर्तृत्वाबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सुनील चिंचोलकरही म्हणतात, ‘सामान्य माणसात असामान्यत्व कसे प्रकट होते याचा वस्तुपाठ तरुणांनी या चरित्रातून शिकावा. एका कुत्र्याला बरे करण्यासाठी त्यांनी केलेले साहस त्यांच्या मनाची कोवळीक दाखवून देते व जखम बरी झाल्यावर कुत्र्याने त्यांच्यावर केलेले प्रेम पशुंमधील कृतज्ञताभाव प्रकट करते. दुसऱ्या भागातील, प्रवचने वाचल्यावर त्यांच्या पारमार्थिक कल्पना किती स्पष्ट आहे, हे ध्यानी येते. ही त्यांची प्रवचने साधकांना दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरतील.’

एका प्रापंचिक साधकाचा जीवनाचा आढावा, नंतर सद्गुरूकृपेमुळे आलेले अनुभव व प्रवचनांच्या माध्यमातून व्यक्त केलेले विचार सर्वच वाचनीय व चिंतनीय असेच आहेत.

पुस्तक : आयुष्याची गोळाबेरीज
लेखक : ग. ना. केळकर
प्रकाशक : सखाराम आठवले प्रकाशन
पाने : ४२३
किंमत : ३०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amol Bajgire About
7888196625
1
0

Select Language
Share Link
 
Search