Next
आनंदवन, ताडोबा-अंधारी, चंद्रपूर
BOI
Wednesday, April 04, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

आनंदवन
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे वनश्रीने नटलेले, खनिजांनी समृद्ध असलेले, महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारे, तसेच आदिवासींचे वास्तव्य असलेले विदर्भातील प्रमुख जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील विविध प्रकारच्या पर्यटनस्थळांची माहिती आपण करून घेणार आहोत. सुरुवात करू या आनंदवन, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूरपासून...
.........
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे वनश्रीने नटलेले, खनिजांनी समृद्ध असलेले, महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारे, तसेच आदिवासींचे वास्तव्य असलेले विदर्भातील प्रमुख जिल्हे आहेत. या जिल्ह्यांतील विविध प्रकारच्या पर्यटनस्थळांची माहिती आपण करून घेणार आहोत.

अशोकसिंह ठाकूरया सगळ्याअगोदर एका व्यक्तीची ओळख करून घेणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे अशोकसिंह ठाकूर. ‘चंद्रपूरचा चालता बोलता इतिहास’ अशी त्यांची ओळख करून दिली जाते. त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील अनेक पुरातन वास्तूंचे/वस्तूंचे संशोधन करून, कोणे एके काळी या आदिवासी भागात असलेल्या सुसंस्कृत लोकजीवनाची ओळख साऱ्यांना करून दिली. (या लेखात वापरलेले चंद्रपूर व आसपासच्या ठिकाणांचे काही फोटो अशोकसिंह ठाकूर यांनी काढलेले आहेत.)

आनंदवनआनंदवन :
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन व उपचार यांसाठी इ. स. १९५२ साली वरोरा या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर ‘आनंदवना’ची स्थापना केली. इ. स. २००८पर्यंत त्यांचा विस्तार १७६ हेक्टर क्षेत्रावर झाला असून, आनंदवन आता ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, एक आजारी गाय आणि सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन अशा स्थितीत बाबांनी कार्य सुरू केले. त्यांच्या पत्नी साधनाताई आणि त्यांची मुले, सुना यांनीही त्यांना साथ दिली.

प्रकल्पाची सर्व व्यवस्था वरोरा येथील महारोगी सेवा समिती मार्फत बघितली जाते. सध्या येथे रुग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रीटिंग कार्ड विभाग, प्रिंटिंग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. त्याशिवाय सुमारे १५० दिव्यांग व्यक्तींचा ‘स्वरानंदवन’ हा वाद्यवृंद आणि केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत..

सोमनाथ प्रकल्पसोमनाथ प्रकल्प, मूल (चंद्रपूर) :
युवकांना कृषी, कृषी औद्योगिक (मशिन दुरुस्ती, गो-पालन, सुधारित कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, इत्यादी) क्षेत्रांत प्रत्यक्ष प्रशिक्षण (प्रॅक्टिकल ट्रेनिंग) द्यावे, प्रशिक्षित भूमिसेना तयार करावी, त्यांनी त्यांच्या गावात परतल्यावर त्या अनुभवाचा वापर करून इतरांना शिकवावे, या हेतूने बाबा आमटे यांनी ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’ (वर्कर्स युनिव्हर्सिटी) स्थापन करण्यासाठी शासनाकडे योजना सादर केली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने संस्थेला झुडपी जंगल असलेली दोन हजार एकर जमीन चंद्रपूर जिल्ह्यातील मूल-मारोडा गावाजवळील सोमनाथ येथे दिली. मार्च १९६७मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. त्या वेळी बाबांसोबत त्यांचे ज्येष्ठ सहकारी शंकरदादा जुमडे व किसन पाल, नाना भुसारी इत्यादी दिव्यांग बंधू होते. त्यांनी जंगलातच बांबूच्या तट्ट्यांच्या झोपड्या उभारल्या. सोमनाथ प्रकल्प, मूल (चंद्रपूर), अशोकवन, नागपूर, लोकबिरादरी प्रकल्प, नागेपल्ली, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा अशा चार ठिकाणी आनंदवनाचा शाखाविस्तार झाला आहे. सामाजिक पर्यटनासाठी ही स्थळे अत्यंत महत्त्वाची आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प :
केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक आता ताडोबा अभयारण्याकडे आकर्षित होत आहेत. स्थानिक आदिवासींचा देव तारू याच्या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव मिळाले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा अभयारण्याचे ११६.५५ चौरस किलोमीटर क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ चौरस किलोमीटर क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२५ चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे. येथे एकूण चार बफर झोन आहेत. या प्रकल्पालगतचे सुमारे ११०१.७७ चौरस किलोमीटर क्षेत्र त्यात येते. त्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्य प्राण्यांचा संघर्ष टळावा अशा ६२५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर हा व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. या जंगलात ऐन, बीज, धौडा, हळदू, साल, सिमल, तेंदू, बेहडा, हरडा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात असून, मोह, ब्लॅक प्लम, अर्जुनफळ, बांबू अशी वनसंपदाही आहे. ‘रॉयल बेंगॉल टायगर’ या प्रजातीमधील सुमारे ८० वाघ सध्या या अभयारण्यात आहेत.

वाघांव्यतिरिक्त हरणे, बारहसिंगे, चितळे, बिबटे, रानमांजरे, गवे, रानडुकरे, नीलगायी, रानकोंबड्या, ठिपकेवाली हरणे असे प्राणी या जंगलात आहेत. मगरी, सुसरी, अजगर, इंडियन कोब्रा, घोरपड हे सरपटणारे प्राणीही प्रामुख्याने येथे आढळतात.

चंद्रपूर जिल्ह्याबद्दल :
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी ‘चांदा’ असे म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ. स. १९८१मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी म्हणतात. कारण जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. चंद्रपुरात चुन्याच्याही अनेक खाणी आहेत.

कोळसा खाणीजिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे. हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे.

चंद्रपूरचे तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. येथील पर्जन्यमान सरासरी १३९८ मिलिमीटर इतके असते. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून, उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. उन्हाळा मोठा व कडक असतो, तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. तांदूळ (खरिप), कापूस, सोयाबीन, गहू, तूर, मूग, उडीद, मिरची ही येथील मुख्य पिके आहेत.

मुळात चंद्रपूर हे पौराणिक व प्राचीन ऐतिहासिक शहर आहे. या भूमीचा स्वामी ‘चंद्र’ व पूर म्हणजे ‘नगर’ अशी याच्या नावामागची गाथा आहे. तीर्थक्षेत्र म्हणूनही ऐतिहासिकदृष्ट्या हे महत्त्वाचे आहे. या नगरीत सत्ययुगात कृतध्वजा सुनंद, त्रेतायुगात चंद्रहास्य, कलियुगात सत्यांग, पांडववंशीय उदयन, तसेच चालुक्य, नागवंशीय आणि गोंड राजांनी राज्य केले आहे.

महाकाली मंदिरमहाकाली मंदिर :
महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ असल्याचे सांगितले जाते. रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य. विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे हे महाकाली मंदिर. या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात. येथे चैत्रात मोठी यात्रा भरते. विदर्भ, मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते. महाकालीची ही यात्रा ‘नांदेडची यात्रा’ म्हणूनही ओळखली जाते.

बीरशाह समाधीबीरशाह समाधी : बीरशाह याची त्याच्या पत्नीने बांधलेली समाधी हे येथील एक आकर्षण आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाते. समाधीचे बांधकाम मुघल पद्धतीचे आहे.

चंद्रपूरचा किल्ला : खांडक्या बल्लाळशहा या गौड राजाने इ. स. १४७२मध्ये हा किल्ला

चंद्रपूरचा किल्ला
बांधण्यास सुरवात केली. त्याने चंद्रपूर येथे राजधानी वसवली. खांडक्या बल्लाळशहाच्या पदरी असलेल्या तेल ठाकूर नावाच्या एक वास्तुशास्त्रज्ञाने त्याचा आराखडा बनविला होता. बल्लाळशहाच्या नंतर त्याचा मुलगा हीरशहा याने तो किल्ला पूर्ण केला. धुंड्या रामशहा (१५९७ ते १६२२) याच्या कारकिर्दीमध्ये किल्ल्याच्या तटबंदीचे काम पूर्ण झाले. चंद्रपूरच्या किल्ल्याला जटपुरा, अचलेश्वर, बिनबा आणि पठाणपुरा असे दरवाजे असून, यातील पठाणपुरा दरवाजा अतिशय देखणा आहे. अंचलेश्वर मंदिर, अपूर्ण देवालय, जटपुरा गेट हीदेखील चंद्रपुरातील काही प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रचंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र : हे आशिया खंडातील तिसऱ्या क्र‘मांकावरील विद्युतनिर्मिती केंद्र‘ असून, या वीज केंद्राची निर्मिती क्षमता २९२० मेगावॉट एवढी आहे. केंद्राला इरई धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

जुनोना : चंद्रपूरपासून १३ किलोमीटरवर हा एक पिकनिक स्पॉट आहे. येथील जलमहाल बघण्यासारखा आहे. चंद्रपूरपासून सहा किलोमीटरवर वनक्षेत्र असून, वन्यजीवांची वस्ती आहे. येथे पांढरा नागही सापडला होता.

घुगुस : चंद्रपूरपासून २५ किलोमीटरवरील हे गाव कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. लॉर्ड मेयो याने १८७०मध्ये येथील खाण सुरू केली; पण आता ती लवकरच बंद होणार आहे. एसीसी कंपनीचा सिमेंट कारखानाही आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. लॉइड्स कंपनीचा स्पाँज आयर्न कारखानाही येथे आहे.

भद्रावती भद्रावती : सध्याचे भांडक रेल्वेस्थानक म्हणजेच पूर्वीचे भद्रावती. कॅनिंगहॅमच्या मतानुसार ही वाकाटक राजांची राजधानी असावी. येथे अनेक ‘बुद्धिस्ट’ अवशेष सापडले आहेत. चिनी प्रवासी ह्युआनसंग याने सन ६३९मध्ये इथे भेट दिल्याचा उल्लेख आहे. येथे एक अतिशय सुंदर असे जैन मंदिरही आहे. श्री स्वप्नदेव श्री केशरिया पार्श्वनाथ प्रभू यांची २३०० वर्षांपूर्वीची सहा फूट उंचीची पद्मासनातील मूर्ती येथे आहे. तसेच विष्णू मंदिरही आहे. येथील एका तलावात अनेक पुरातन मूर्ती सापडल्या आहेत. तसेच वरदविनायक, देऊळवाडा, विजासन, भद्रमंदिर, भव्य गुंफा मंदिर, भांदक किल्ला, गवराळा ही लक्षवेधी स्थानेही जवळपास आहेत. हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांच्या वैभवशाली खुणा भद्रावतीत आढळतात. भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडवितात. हे ठिकाण चंद्रपूरपासून २६ किलोमीटरवर आहे.

विजासन टेकडी विजासन टेकडी : विजासन म्हणजे विद्येचे आसन. हे ठिकाण भद्रावतीजवळ असून, येथे ६४ फूट लांबीची बौद्ध गुंफा आहे. तिच्या दोन्ही बाजूंना लेण्या आहेत.

चंदनखेडा : येथे १० हजार वर्षांपूर्वीचे मानवी संस्कृतीचे अवशेष अशोकसिंह ठाकूर यांनी शोधले आहेत. डोलमेन (मेगालिथिक स्ट्रक्चर), खापराची भांडीही तेथे सापडली आहेत. हे ठिकाण चंद्रपूरपासून ५० किलोमीटरवर आहे.

बल्लारपूर/बल्लारशाह : १३व्या शतकातील गोंड राजा बल्लाळ याला अत्यंत असाध्य त्वचारोग झाला होता. त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून वर्धा नदीच्या पलीकडे किल्ल्याची स्थापना केली. तेव्हापासून बल्लारपूर हे नाव रूढ झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील हे एक औद्योगिक व शैक्षणिक शहर आहे. हे ठिकाण कोळशाच्या खाणीसाठीही प्रसिद्ध आहे. करमचंद थापा यांनी १९४५मध्ये पेपर मिलची स्थापना केली. येथे ८०० वर्षांपूर्वीचा लाकडाचा डेपो संरक्षित करून ठेवण्यात आला आहे. हे ठिकाण चंद्रपूरपासून २० किलोमीटरवर आहे.

ब्रह्मपुरी : हे सातवाहन राजवटीतील शहर असून, आता गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट झाले आहे. येथील उत्खननात जुन्या ब्राँझच्या वस्तू, नाणी आढळून आली आहेत. हे ठिकाण चंद्रपूरसून १२४ किलोमीटरवर आहे.

चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांतील आणखी काही पर्यटनस्थळांबद्दलची माहिती घेऊ पुढच्या भागात...

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

ताडोबा अभयारण्य
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Atre About 334 Days ago
सुंदर विदर्भाचा परिचय !
0
0
Shreyas Joshi About 345 Days ago
सुंदर माहिती👌
0
1
उदय अकोलकर About 347 Days ago
खूप सुंदर उपक्रम आणि लिखाण आहे माधव जी मनस्वी धन्यवाद
1
0
Hemant Gharote About 348 Days ago
Surekh varnan an yogya mahiti Karan ya ssmpurna bhagat baryach varshan pasun mi swata samparkat aahe mala mahit aahe
1
0
श्री संभाजी सातव. About 348 Days ago
अतिशय सुंदर माहिती मिळाली.! आज मितीला अशी माहिती मुलांना कळणे गरजेचे आहे. मोबाईल यंत्रणा खूप चांगली आहे, तितकी घातक पण आहे. असो ते सर्व पालकांनी लक्षपूर्वक काळजी घेतली पाहिजे. सर, खूप खूप धन्यवाद!
1
0
वसंत परब About 348 Days ago
सुंदर माहिती
1
0
जयश्री चारेकर About 348 Days ago
फारच छान व सविस्तर माहिती दिली आहे
1
0
Milind Lad About 349 Days ago
Very much informative article with historical information of location & good photos of location & nature. Thanks Madhavji Great efforts.
1
1
Dattatray Phadke About 349 Days ago
खूप अनमोल माहिती मिळाली. माधवराव धन्यवाद.
1
0
वसंत लांडगे About 349 Days ago
विदर्भाला पूर्वी व-हाड म्हणजे सोन्याची कु-हाड म्हणायचे.काळी जमीन,कापसाचे नगदी पीक .सुखवस्तु जमीनदार.खाण्यापिण्याची रेलचेल .असे वातावरण होते.सांस्कृतिक समृद्धी देखिल भरपूर.त्यांची साक्ष या लेखात आहेच.चांगली माहिती. धन्यवाद.
1
0
Satish dhande About 349 Days ago
Khup sunder mahiti sir!
1
0
Rajendra Dhamdhere About 349 Days ago
खुप सुंदर
1
0
Sudhir Bokil About 349 Days ago
प्रकाशवाटा मधून प्रकाश आमटे यांचं नांव पुढं आलं. विकास आमटे यांनी कमीत कमी खर्चात पाण्याचे सुंदर नियोजन केलंय. पाऊस झाला तर वर्षभर आदिवासींच्या वस्त्यांमध्ये आणि शेतीला पुरेल असे पाण्याचे नियोजन केलंय. आनंदवन तर गेली ७० वर्षे काम करतंय!
1
0
Milind About 349 Days ago
Chan mahiti Dhanyvad.
1
0
Parashuram Babar About 349 Days ago
Atishay chhan mahiti.
1
0

Select Language
Share Link