Next
मांडवी पर्यटन महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन
BOI
Monday, April 30, 2018 | 03:32 PM
15 0 0
Share this article:

मांडवी पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर.

रत्नागिरी : मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था आणि श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मांडवी पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते २८ एप्रिलला करण्यात आले.

होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या वंदना चिकटे यांना पैठणी घेऊन गौरविताना नगरसेविका दया चवंडे आणि मान्यवर.सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांच्या निमित्ताने २८ एप्रिल ते एक मे २०१८ या कालावधीत मांडवी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेले दोन दिवस मांडवी समुद्र किनारी सुरू असलेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी होम मिनिस्टर स्पर्धा रंगली. या स्पर्धेचे उद्घाटन उषा कीर यांच्या हस्ते करण्यात आले. समुद्र किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने या महोत्सवाला दिमाखात प्रारंभ करण्यात आला. मुंबई येथील सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना माधुरी आचरेकर यांनी या वेळी धमाकेदार लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या नंतर मांडवी आणि परिसरातील माहेरवाशिणींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान महिलांनी विविध गाण्यांवर ठेका धरला आणि स्नेहमेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला. होम मिनिस्टर स्पर्धेत वंदना चिकटे यांनी पैठणी जिंकली. स्पर्धेला आणि स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या सुरुवातीला मांडवी येथील भैरी मंदिर ते मांडवी समुद्र किनारा अशी शोभायात्रा काढण्यात आली. यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

स्नेहमेळाव्याचा मनसोक आनंद लुटताना माहेरवाशिणीमहोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ एप्रिलला सकाळी मांडवी पर्यटन महोत्सव संस्था, श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट, जिल्हा जलतरण संघटना आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ६०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यात पुरुष गटात यज्ञित वारे, तर महिला गटात श्रीया पाकळेने प्रथम क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा­­­ वेगवेगळ्या वयोगटात घेण्यात आली. स्पर्धेचा सविस्तर असा : १२ ते १७ वर्षे मुले- यज्ञित वारे, करण मिलके, प्रणव गडदे. मुली- श्रीया पाकळे, तनया मिलके, श्रावणी खटावकर. १७ ते २५ वर्षे- प्रेमसागर चव्हाण, वेदांग करकरे, कौस्तुभ आम्रे. २५ ते ३५ वर्षे- विवेक विलणकर, तेजस माने, आदित्य जैसवाल, मुली- गौरी मिलके. ३५ ते ४५ वर्षे पुरुष- हरेष करमरकर, विजय लाड, दिनेश जैन. महिला- मधुलीला देसाई, अश्विनी नलावडे, सुजाता कदम.

जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धकरविवारी सायंकाळी मराठी व हिंदी गीतांचा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (ता. ३०) संध्याकाळी फॅशन शो, स्थानिक लोककला आणि गाण्याचे कार्यक्रम होणार आहेत. एक मे रोजी वेसावकर आणि सहकारी ‘दर्याचा राजा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, श्री देव भैरव देवस्थानचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, नगरसेवक बंटी कीर, नगरसेविका दया चवंडे, रशीदा गोदड, नितीन तळेकर, राजन शेटे, बिपिन शिवलकर, संतोष शिवलकर, काका तोडणकर, प्रवीण रुमडे, मनीषा बेडगे, शंकर मिलके, आदित्य वारंग आदी मेहनत घेत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सौ. वैशाली अविनाश घाणेकर About
मांडवी पर्यटन महोत्सवाच्या यशस्वी आणि दिमाखदार आयोजनासाठी मनःपूर्वक अभिनंदन
0
0

Select Language
Share Link
 
Search