Next
आंतरराष्ट्रीय योगदिनास मंत्रालयात उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, June 21, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आज (२१ जून) महाराष्ट्र शासन व योग संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात योगदिन साजरा करण्यात आला. या योगदिनास मंत्रालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, पदूममंत्री महादेव जानकर, कामगार मंत्री संजय कुटे, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने योगा कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.


या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले कार्य व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मन:शांती आवश्यक असून, त्यासाठी योगा करणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेमध्ये काम करताना प्रत्येकाने शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे. धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकांना मानसिक ताण असतो. हा ताण कमी करण्यासाठी योगा करणे आवश्यक आहे.’ 

योगा संस्थेच्या रूपा व्यास यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. प्रारंभी योगा संस्थेच्या सचिव डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘आपले कुठलेही कार्य करण्याआधी स्वत:च्या शरीरावर लक्ष केंद्रित करून पाच मिनिटे डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष दिले गेले पाहिजे. त्यानंतरच काम करण्यास सुरवात करावी.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search