Next
‘यूटीआय’तर्फे बायोमेट्रिक पडताळणी सादर
प्रेस रिलीज
Friday, December 08 | 03:31 PM
15 0 0
Share this story

पुणे : गुंतवणूकदारांना केवायसी नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे अमर्यादित आणि कागदपत्रांशिवाय पुरवण्यासाठी, यूटीआय म्युच्युअल फंडाने आधार कार्ड स्थित ई-केवायसीमध्ये बायमेट्रिक पडताळणी यूआयडीएआयद्वारे समाविष्ट केली आहे. यूटीआयच्या सर्व १५० शाखांमध्ये बायोमेट्रिक उपकरणे बसवण्यात आली असून, ही उपकरणे यूआयडीएआयसह नोंदणीकृत विक्रेत्यांकडून घेण्यात आली आहेत.

यूटीआय एएमसीच्या विक्री आणि वितरण विभागाचे ग्रुप अध्यक्ष सुरज केलेय म्हणाले, ‘केवायसी पूर्ण नसलेला कुठलाही ग्राहक आता केवायसी प्रक्रिया बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ती पूर्ण करू शकतो. यासाठी छायाचित्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पत्ता यापैकी कशाचीही आवश्यकता नाही. केवळ पॅन आणि आधार कार्डाचे तपशील गरजेचे आहेत.’

केलेय पुढे म्हणाले, ‘याशिवाय बायोमेट्रिक पडताळणी वापरण्याचा अन्य फायदा म्हणजे गुंतवणूकदारांना कुठल्याही नियंत्रणाशिवाय कितीही रक्कम यूटीआयच्या योजनांमध्ये गुंतवता येते. उदाहरणार्थ, दर आर्थिक वर्षासाठी ओटीपीस्थित केवायसीमध्ये ५० हजारांच्या गुंतवणुकीची मर्यादा आहे. यूटीआय पुरवत असेलल्या बायोमेट्रिक सुविधेमुळे गुंतवणूकदारांसाठी केवायसी प्रक्रिया अतिशय सुलभ झाली आहे.’

यूटीआय म्युच्युअल फंडाबद्दल
सेबी नोंदणीकृत असलेल्या यूटीआय म्युच्यअल फंडाचे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी प्रायोजक आहेत. यूटीआय म्युच्युअल फंड हा भारतातील सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड असून, ३० सप्टेंबर २०१७पर्यंत २३० स्थानिक योजना, आराखड्यांचे एक कोटींच्या खात्यांची गुंतवणूक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link