Next
‘मॅगी किचन जर्नी’मध्ये महिलांच्या यशोगाथा
प्रेस रिलीज
Tuesday, July 17, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘मॅगी’तर्फे ‘कुछ अच्छा पक रहा है’ याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ‘मॅगी किचन जर्नी’ ही संकल्पना त्याचाच एक भाग आहे. अनेक महिला आपली स्वप्न साकार करण्यासाठी, स्वतःच्या आयुष्यातील बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवण्यासाठी आपल्या पाककलेचे सामर्थ्य आजमावतात. या संकल्पनेच्या माध्यमातून अशा महिलांची हिंमत आणि उत्साह याला दाद दिली जात आहे.

या उपक्रमाविषयी नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन् म्हणाले, ‘आमच्या उत्पादनांच्या हेतूमधून आम्हाला नेहमीच पाककलेतील सर्वोत्तम तज्ज्ञ लाभले आहेत. लोकांना आपली हिंमत आजमावताना पाहणे, त्यांच्या आयुष्याशी लढताना पाहाणे आणि समाजात बदल घडवताना पाहाणे नेहमीच प्रेरणादायी असते. आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी दर दिवशी आपल्या पाककलेचा वापर करून उच्चतम उंची गाठणाऱ्या महिलांच्या यशोगाथा साजऱ्या करण्याचा प्रयत्न ‘मॅगी किचन जर्नी’मधून करण्यात आला आहे. या महिलांनी प्राप्त केलेले अभूतपूर्व यश नक्कीच प्रेरणादायी आहे.’

‘मॅगी किचन जर्नी’द्वारे १२ सहृदयी महिलांच्या प्रेरणादायी कथा दर्शवण्यात येणार आहेत. स्वयंपाक हे माध्यम वापरून स्वतःची ओळख कशी निर्माण केली ते यातून कळणार आहे. या महिलांनी त्यांच्या पाककलेचा वापर विविध मार्गांनी अतिशय सर्जनशीलतेने केला आहे आणि त्यातून बदल घडवला आहे. ‘किचन जर्नी’तून महिला आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ठामपणे उभ्या राहिल्या आणि या कठीण परिस्थितीतून कशा प्रकारे बाहेर पडल्या, पॅशन असलेल्या गोष्टीसाठी कशा प्रकारे उभारणी केली हा प्रवास उलगडत जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link