Next
काल्हेर ग्रामपंचायतीत होणार आता कॅशलेस व्यवहार
स्वाइप मशीनचे उद्घाटन; सरपंच अॅड. समीर पाटील यांच्या प्रयत्नांना यश
मिलिंद जाधव
Saturday, July 06, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this article:


भिवंडी : येथील काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड. समीर पाटील व सरपंच श्रीधर पाटील यांच्या प्रयत्नांनी तालुक्यात प्रथम डिजिटल इंडिया स्वाइप मशीन सुरू झाले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले. 

भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केंद्र शासनाने नोटाबंदी व कॅशलेस व्यवहाराच्या माध्यमातून पाऊल उचलले आहे. ग्रामस्थांच्या हितासाठी व सुलभ बॅंकिंग व्यवहारांसाठी स्वाइप मशीनचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे पाणीपट्टी, घरपट्टी तसेच इतर बिलांच्या व्यवहारासाठी हे मशीन फायदेशीर ठरणार असून, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा वेळ वाचणार असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.  

या वेळी भाजप काल्हेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटील, सरपंच संजय पाटील, सरपंच मुरारी बाबु पाटील, सरपंच पुंडलिक भोकरे, पंचायत समिती सदस्य विनोद मुकादम, पंचायत समिती सदस्य महेंद्र नाथा पाटील, उपसरपंच स्नेहा पाटील, उपसरपंच छंदा पाटील, उपसरपंच हेमांगी म्हात्रे, उपसरपंच नरेश तरे, ग्रामपंचायत सदस्य दीपिका तरे, ग्रामविकास अधिकारी राठोड, समाजसेवक गोरखनाथ जोशी, रवींद्र पाटील, वेताळ मंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search