Next
‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर
प्रेस रिलीज
Saturday, July 07, 2018 | 03:02 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : तनिष्क या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या अलंकार ब्रॅंडने ‘गुलनाझ’ हे नवीन कलेक्शन सादर केले आहे. निसर्गाच्या औदार्याचे सौंदर्यपूर्ण प्रतिनिधित्व करणारी डिझाइन्स हे तनिष्कच्या या नवीन कलेक्शनचे वैशिष्ट्य आहे.

या कलेक्शनमधील प्रत्येक दागिना अत्यंत बारकाईने डिझाइन केलेला आणि मोहात पाडणारा आहे. स्त्रीच्या रूपाला पूर्णत्व देणारे हे दागिने आहेत. ‘गुलनाझ’ कलेक्शनमध्ये लक्षवेधी हिऱ्याच्या दागिन्यांसोबतच ओपन पोल्कीमधील काही डिझाइन्सही आहेत.

हिरे या कलेक्शनमधील जडवलेले (स्टडेड) अलंकार म्हणजे पिवळे, गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्याची संगती साधणारे फुलांचे आकार व नक्षीकामाची मैफल आहे. दूरवर जाणारी वाट, फुलपाखरे, राखलेली कुंपणे आणि फुलांचे मांडव यांपासून प्रेरणा घेत ही डिझाइन्स तयार करण्यात आली आहेत. या कलेक्शनमध्ये काढण्या-घालण्याजोगी पेंडंट्स असलेले नेकलेसेस, स्टड्स व लोंबते कानातले अशा दोन्ही स्वरूपात वापरता येतील, असे जॅकेट इअररिंग्ज आणि पेंडंटसारखे वापरता येतील असे मांग टिके आहेत.

उत्तमरित्या पैलू पाडलेल्या हिऱ्यांसह १८ कॅरट सोन्यात घडवलेले नेकपीस तुमच्या प्रशंसेला नक्कीच पात्र ठरतील ती त्याच्यावरील फुलपाखरू आणि मधमाशीच्या रोचक स्थानामुळे, तसेच गुलाबी सफायरची छाया आणि पट्ट्यापट्ट्यांच्या एनॅमलिंगमुळे. एखाद्या शाही उद्यानातून मारलेल्या सुखद फेरफटक्याची आठवण हे उत्कृष्ट नेकलेस करून देते. हे नेकसेल एका सेटचा भाग आहे.

१८ कॅरटच्या गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्यात हाताने हे नेकलेस घडवले आहे. जपानमधील चेरी ब्लॉसमच्या अलौकिक सौंदर्यापासून प्रेरणा घेत साकुराच्या फुलांचा आणि कळ्यांचा एक नाजूक गुच्छ यात बसवण्यात आला आहे.  अभिजात आणि उच्च अभिरूची असलेल्या स्त्रियांसाठीचा हा दागिना आहे. हे नेकलेसही सेटचा भाग आहे.

बागेतील एका लतावेलींची कमान असलेल्या वळणदार रस्त्यांपासून प्रेरणा घेऊन नेकपीसची डिझाइन करण्यात आलेला हा दागिना एरवी अभिजात स्वरूपाचा असला, तरी त्याला एक समकालीन स्पर्शही आहे. १८ कॅरट गुलबक्षी आणि पांढऱ्या सोन्यात हाताने घडवलेला हा दागिना आहे. हा नेकलेसही सेटचा भाग आहे.

तनिष्कच्या गुलनाझ कलेक्शनमधील ओपन पोलकी डिझाइन्सचे वैशिष्ट्य म्हणजे फुलांच्या वेली, उसळते कारंजे आणि राजेशाही मुघल बगिच्यांमधील रेशमी पैसले यांसारख्या वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश यात करण्यात आला आहे.

२२ कॅरट पिवळे सोने आणि ओपन पोलकी यांच्यासह घडवलेला दिमाखदार मोराच्या डिझाइनचा सेट, नेकलेसमधील नाण्यांचा समूह हा केवळ डिझाइनचा भाग नव्हे, तर ते अनेक संस्कृतींमध्ये समृद्धीचे प्रतीक आहे. वैविध्यपूर्ण आकार आणि स्वरूपांचा उत्तम संयोग साधला गेल्यामुळे हा दागिना सणवार आणि लग्नांसारख्या सर्व प्रकारच्या समारंभांसाठी शोभून दिसतो.

सोने आणि ओपन पोल्कीचा सेट उद्यानात दिसणारा पानांचा वर्षाव आणि वेलींपासून प्रेरणा घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. २२ कॅरट पिवळ्या सोन्यात घडवलेला हा देखणा दागिना ग्लॅमरचा स्तर नक्कीच वाढवतो.

अत्यंत बारकाईने डिझाइन करण्यात आलेला चोकर सेट अभिजातता आणि समकालीनता यांचा परिपूर्ण समतोल आहे. २२ कॅरट पिवळ्या सोन्यात ओपन पोलकीसह हाताने घडवलेल्या या डिझाइनमध्ये सात हिऱ्यांचा संच एकत्रितपणे बसवण्यात आला आहे. हे डिझाइन फुलाचा संपूर्ण बहर डोळ्यापुढे ठेऊन करण्यात आले आहे.

सलीपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या नेकलेसमध्ये एखाद्या उद्यानातील संपूर्ण सिम्फनीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. खालच्या बाजूला थेंबाच्या आकारातील रंगीत खडे आणि ओपन पोलकी कामामुळे या दागिन्याच्या सौंदर्याला उठाव आला आहे. हा देखणा अलंकार २२ कॅरट पिवळ्या सोन्यात घडवण्यात आला असून, याची उत्कृष्टता कालातीत आहे.

‘गुलनाझ’ कलेक्शनमधील दागिन्यांच्या किंमतींची श्रेणी दोन लाख रुपयांपासून सुरू होत असून, तनिष्कच्या भारतभरातील सर्व १९९ स्टोअर्समध्ये हे कलेक्शन उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search