Next
गड-किल्ले, दुर्गसंवर्धन विषयांवरील छायाचित्रांचे प्रदर्शन
BOI
Friday, May 03, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:


पुणे : श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे येथील बालगंधर्व कलादालनात दोन ते चार मे या कालावधीत महाराष्ट्रातील गड-किल्ले व दुर्गसंवर्धन या विषयांवरील ‘शिवरायांची दुर्गरत्ने’ हे विशेष छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. 

दोन मे रोजी सकाळी ११ वाजता विख्यात मुर्तीशास्त्रतज्ज्ञ व ‘डेक्कन अभिमत विद्यापीठा’चे माजी कुलपती डॉ. जी. बी. देगलूरक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी देगलूरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ‘शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय जनतेकडून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन सुरू झाले, हे अत्यंत आशादायी चित्र आहे व त्यासाठी श्री शिवदुर्ग संवर्धनने पुढाकार घेतला ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. प्रदर्शनातील विविध किल्ल्यांची उत्कृष्ट छायाचित्र ही जमेची बाजू आहे. श्री शिवदुर्ग संवर्धनने काही किल्ल्यांवर नेमलेल्या दुर्गपाल-किल्लेदारांकडून वर्षभर नियमित देखभाल केली जाते, ही आदर्श बाब आहे यासाठी या संस्थेला फार मोठा आर्थिक खर्च करावा लागतो, त्याकरिता अशा कार्यास जनतेने भरघोस आर्थिक मदत करावी, असे नम्र आवाहन करतो’, या शब्दांत डॉ. देगलूरकर यांनी आपले मत व्यक्त केले.

याप्रसंगी संस्थेचे पंडित अतिवाडकर, प्रा. सुरेंद्र नावडे, दर्शन वाघ व आर्यन वाघ हे उपस्थित होते. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध २५ किल्ल्यांची ५५० छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी खूले असून प्रवेश विनामूल्य आहे. 

प्रदर्शनात महाराष्ट्रातील प्रमुख गड किल्ले रोहिडा, राजगड, तिकोणा, तुंग, पेडगावचा बहादूरगड, रायरेश्वर, रायगड, प्रतापगड, कंधार, बल्लारपूर या किल्ल्यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातील पाच किल्ले (कायर, मार्डी, दुरुग, कळंब, रावेरी) कुंगाव, शिवनेरी, तोरणा अंतुर इत्यादी किल्ल्यांचा समावेश आहे. 

श्री शिवदुर्ग संवर्धन ही संस्था पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व पुरातत्त्व विभाग, वन विभाग व जनतेच्या सहकार्यांतून २००७पासून राजगड, रोहिडा, तिकोना, बहादूरगड, तुंग, रायरेश्वर, अंतुर इत्यादी किल्ल्यांवर दूर्ग संवर्धन कार्य करत आहे. शिवरायांच्या प्रमुख गड-किल्ल्यांची व महाराष्ट्रातील दुर्गसंवर्धन कार्याची माहिती जनतेपर्यंत पाहोचवणे व या कार्यांत जनतेचा सहभाग वाढवणे व उद्देशाने संस्थेने हे प्रदर्शन आयोजित केले असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search