Next
युवा प्रताप पुरस्कार वितरण सोहळा
प्रेस रिलीज
Saturday, February 10, 2018 | 10:50 AM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपुणे : कृषी पदवीधर संघटनेचे ‘युवा प्रताप पुरस्कार’ जाहीर झाले असून, पुरस्कार वितरण सोहळा ११ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.

पुरस्कारांचे वितरण शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, आमदार बच्चू कडू, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश लांडगे या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

महेश कडूसप्रगतीशील शेतकरी, उद्योजक, कृषी संशोधक, कृषी शिक्षक, महिला सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यकर्ते, कृषी विषय हाताळणारे पत्रकार अशा ४८ व्यक्ती आणि संस्थांना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याच्या कृषी क्षेत्राला कसे पुढे नेता येईल आणि शेतीतील नैराश्य दूर करण्यासाठी काय करता येईल, याबाबत या सोहळ्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘कृषी पदवीधर संघटने’चे अध्यक्ष महेश कडूस यांनी दिली. 

पुरस्कार सोहळ्याविषयी :
दिनांक : ११ फेब्रुवारी २०१८, रविवार
वेळ : दुपारी साडेतीन
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Gurudatta Lamture About
Great Initiative to reward people who are working in Agriculture
1
0

Select Language
Share Link
 
Search