Next
विसावा
BOI
Saturday, June 16, 2018 | 11:08 AM
15 0 0
Share this story

समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित मंजिरी श. धूपकार यांनी लिहिलेली ही चरित्रातील ठळक प्रसंगांसह बारकावेही त्यांनी टिपले आहेत. नारायण ते रामदास ते समर्थ असा हा प्रवास आहे. या प्रवासातील वाटावळणे, ऐतिहासिक घटना, प्रसंग आदींची त्यांनी गुंफण केली आहे. रामदासस्वामींची जडणघडण कशी झाली हे त्यांतून समजते.

हे ललित शैलीतील लेखन असले, तरी त्या वेळच्या सामाजिक, राजकीय स्थितीचे दर्शनही त्यांतून घडते. समर्थांचे प्रारंभीचे जीवन आणि नंतरचे जीवन यांतील फरक समजतो. घरातून गेल्यावर भारतभर भ्रमण करणारे समर्थ दिसतात, तर उत्तरार्धात वेण्णस्वामींचे निर्वाण, समर्थांची जीवनसमाप्ती आदी घटना समोर येतात. ‘मनात असलं की सगळं जमतं,’ हा विश्वास रामदासांनी वाचकांना दिला आहे.

प्रकाशक : संस्कृत स्वाध्याय प्रकाशन
पाने : ३४४
किंमत : ३५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link