Next
‘महिला मुख्यमंत्री’ अभियानाद्वारे डॉ. आंबेडकरांना अभिवादन
मिलिंद जाधव
Tuesday, December 11, 2018 | 04:20 PM
15 0 0
Share this article:



मुंबई : दादर चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक अधिकार मंचातर्फे (नाम) ‘मिशन २०१९ महिला मुख्यमंत्री’ या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

‘जेंडर गॅप रिपोर्ट २०१७नुसार १४४ देशांच्या सूचीमध्ये भारताला दिलेले १०८ वे स्थान अत्यंत अपमानास्पद आहे. म्हणूनच ‘मिशन २०१९ पहिली महिला मुख्यमंत्री’ या अभियानाच्या माध्यमातून आम्ही भारताच्या या जागतिक प्रतिमेत बदल आणू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही विधानसभेत व लोकसभेत एससी, एसटी, ओबीसी, मुस्लीम महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची आम्ही मागणी करत असून, त्यासाठी संघर्ष करण्यासाठी वचनबद्ध आहोत’ असे ‘नाम’च्या पत्रकात म्हटले आहे.

शिवाजी पार्कवर अभिवादन करण्यासाठी आलेल्या आठ हजार महिलांनी स्वाक्षरी करून ‘मिशन २०१९ महिला मुख्यमंत्री’ अभियानाला सहमती दर्शवली. या वेळी १०० कार्यकर्ते सहभागी होते.

याबाबत बोलताना अमोल मडामे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत महिला महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद महिला भूषवू शकली नाही. देशातील इतर राज्यांत तेथील जनतेला महिला मुख्यमंत्री मिळाल्या; पण महाराष्ट्राला अजूनही नाही पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मानाने मिरविणाऱ्या महाराष्ट्राला नक्कीच हे भूषणावह नाही. ६० वर्षे होऊनही राज्याला पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा ठोस करण्यासाठी ‘मिशन २०१९ महिला मुख्यमंत्री’ या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने महिलांचे भारतीय राजकारणातील प्रतिनिधित्व वाढविणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच या अभियानाच्या माध्यमातून महिलांचे, राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व ५० टक्क्यांपर्यंत वाढविणे, त्यांचे मानसिक परिवर्तन घडवून आणणे व पुरुषप्रधान राजकारणाचा पोत बदलणे यासाठी कार्यरत असणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search