Next
‘क्रेडाई’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सतीश मगर
BOI
Monday, April 01, 2019 | 12:36 PM
15 0 0
Share this article:

‘क्रेडाई’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा यांच्याकडून सतीश मगर यांनी ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी (डावीकडून) क्रेडाईचे सचिव पंकज गोयल, अध्यक्ष सतीश मगर, माजी अध्यक्ष जक्षय शहा आणि नियोजित अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया.

पुणे : ‘क्रेडाई’ या खासगी स्थावर मालमत्ता विकासकांच्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदी पुण्यातील नामवंत बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांची नियुक्ती झाली आहे. रविवारी, ३१ मार्च रोजी पुण्यात झालेल्या एका समारंभात सतीश मगर यांनी ‘क्रेडाई’चे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी ‘क्रेडाई’चे सचिव पंकज गोयल, नियोजित अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांच्यासह देशभरातील सदस्य, पदाधिकारी आणि सर्व माजी राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित होते. २० वर्षे जुन्या असलेल्या या संस्थेचे भारतभरात २३ राज्ये आणि २०५ सिटी चॅप्टर्स आहेत; तसेच १२ हजारहून अधिक सदस्य आहेत. 


‘रेरा, जीएसटीमुळे नव्याने आखण्यात आलेले स्वरूप आणि ‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट विचारात घेऊन रीअल इस्टेट क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यास आपण कटिबद्ध आहोत,’ असे या वेळी सतीश मगर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘सर्व माजी अध्यक्षांनी गेल्या २० वर्षांत निर्माण केलेला ‘क्रेडाई’चा दमदार वारसा पुढे नेत पुढील दोन वर्षांत ‘क्रेडाई’चे अस्तित्व आणखी १०० शहरांमध्ये विस्तारित करणार असून, ‘नवभारता’च्या लाटेवर स्वार होत द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शहरांवर अधिक भर देणार आहोत;तसेच पुढील दोन वर्षांत एक लाख बांधकाम कामगारांना प्रशिक्षत करण्याचे लक्ष्य आहे’. 

‘रेरा, बीओसीडब्ल्यू यासारखी वैधानिक मंडळे आणि प्रशिक्षण, प्रशिक्षणवृद्धी आणि आरपीएल, तसेच केंद्र सरकारच्या इतर योजनांसाठीच्या कल्याणकारी मंडळांसोबत सहयोग जोडण्याच्या संधी धुंडाळण्यात येणार असून, सर्वसमावेशक उपक्रमाचा भाग म्हणून क्रेडाई भारतभरात पाच लाख झाडे लावणार आहे. प्रत्येक स्टेट आणि सिटी चॅप्टरला हे उद्दिष्ट गाठण्यासाठी ठराविक लक्ष्य दिले जाणार आहे; तसेच विमेन्स विंग, न्यू इंडिया समिट आदी उपक्रमांवरही भर देण्यात येणार आहे,’ असेही मगर यांनी सांगितले. 

‘‘क्रेडाई नॅशनल’च्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेणे हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. आपल्या सगळ्यांसाठीच मागील २० वर्षांचा हा प्रवास फारच देदिप्यमान होता आणि याच आधारस्तंभांच्या आधारे प्रगती आणि विकासाच्या नव्या युगाचे प्रतिनिधीत्व आम्ही करणार आहोत. भारतीय रीअल इस्टेट क्षेत्र हे भारतातील एक सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि ‘नवभारता’च्या निर्मितीत दिलेले हे योगदान फारच मोलाचे ठरणार आहे, यावर ‘क्रेडाई’मध्ये आमचा विश्वास आहे,’ असेही मगर यांनी नमूद केले. 

‘क्रेडाई’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जक्षय शहा म्हणाले, ‘मी सतीश मगर यांचे अभिनंदन करतो आणि ‘क्रेडाई नॅशनल’चे नवे अध्यक्ष म्हणून त्यांनी सुरू केलेल्या या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देतो. गेली दोन वर्षे फक्त ‘क्रेडाई’साठीच नाही, तर एकूण रीअल इस्टेट क्षेत्रासाठी अत्यंत उलथापालथीची होती. ‘क्रेडाई’ने आपल्या कामातून भारतीय रीअल इस्टेट क्षेत्र आणि त्यातील भागधारकांसाठी अत्यंत हितकारक वातावरण तयार केले आहे. मगर यांचा अनुभव आणि या क्षेत्रासंदर्भातील त्यांचा समग्र दृष्टीकोन पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली ‘क्रेडाई’ नव्या उंचीवर पोहोचले, असा आम्हाला विश्वास आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search