Next
‘लाव्हा’तर्फे ‘लाव्हा झेड६१’ सादर
प्रेस रिलीज
Monday, August 06, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

पुणे : लाव्हा इंटरनॅशनल लिमिटेडने ‘लाव्हा झेड६१’ सादर करत असल्याची घोषणा केली. स्टाइलिश डिझाइन आणि वैशिष्ट्यपूर्ण कॅमेरा असलेला ‘झेड६१’ हा ‘लाव्हा’च्या झेड स्मार्टफोनच्या श्रृखंलेतील स्मार्टफोन आहे.

नव्या ‘झेड६१’मध्ये शार्प क्लिक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे वापरकर्त्याला बारीक तपशील कॅमेऱ्यात कैद करून फोटोग्राफीचा अभूतपूर्व आनंद मिळविता येतो. आठ एमपी ऑटोफोकस मागील कॅमेरा, पाच एमपी पुढचा कॅमेरा (स्क्रीन आणि एलइडी फ्लॅशसह) आणि सुधारित बोकेन मोड असलेल्या ‘झेड६१’ स्मार्टफोनमुळे अत्याधुनिक कॅमेऱ्याचा अनुभव मिळतो.

मुख्यत: परिपूर्ण स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना डोळ्यापुढे ठेऊन १८:९ फूल-स्क्रीन आणि उत्कृष्ट डिझाइनचा ‘झेड६१’ हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे. यामध्ये एक जीबी रॅम, १६ जीबी रोम, तीन हजार एमएएच बॅटरी असून, त्याची किंमत पाच हजार ७५० रुपये आहे. हा स्मार्टफोन ८० हजारांहून अधिक आउटलेटमध्ये ब्लॅक आणि गोल्ड रंगात उपलब्ध असेल. दोन जीबी रॅम असलेला दुसऱ्या प्रकारचा ‘झेड६१’ हा स्मार्टफोन ऑगस्ट २०१८मध्ये सादर करण्यात येईल.

स्मार्टफोनच्या या सादरीकरणाबाबत ‘लाव्हा इंटरनॅशनल’चे उपाध्यक्ष दीपक महाजन म्हणाले, ‘छोट्या-छोट्या गोष्टी देखील खूप वेगळेपण दाखवू शकतात, असे आम्ही मानतो आणि आमच्या झेड श्रृंखलेत नुकताच दाखल झालेला ‘झेड६१’ हा त्याचे प्रतीक आहे. आमचा हा नवा स्मार्टफोन कॅमेऱ्याचा अतुलनीय अनुभव देण्याबरोबरच सुंदर डिझाइन आणि निर्दोष कार्यक्षमता असलेला देखील आहे. याच्या शार्प क्लिक तंत्रज्ञानामुळे अतिशय आकर्षक आणि हाय-डेफिनेशन छायाचित्रे काढता येतात; तसेच एचडी+स्क्रीनमुळे वापरकर्त्याला उत्कृष्टपणे व्हिडिओ पाहण्याचा आनंद मिळतो. यशस्वी ठरलेल्या लाव्हाच्या झेड श्रंखलेतील हा नवा स्मार्टफोन सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा आम्हाला विश्वास आहे.’

‘झेड६१’चे डिझाइन आणि तंत्रज्ञान यामुळे स्मार्टफोन वापरण्याचा आनंद द्विगुणित करतो. २.५डी कर्व्हवरील कॉर्निंग गोरिला ग्लाससह पूर्ण लॅमिनेशनचा ५.४५ इंच एचडी+स्क्रीन हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये आहेत. ८.६५ मिमी जाडी असलेला हा स्मार्टफोन अतिशय स्लीकेस्ट स्मार्टफोन्सच्या श्रेणीतील एक फोन आहे. स्मार्टफोनच्या लेसर फिनिश डिझाइनमुळे तो स्लीम दिसतो आणि त्याच्या प्रीमियम स्टाइलमध्ये त्यामुळे अधिक भर पडली आहे.

एक जीबीसाठी अॅंड्रॉइड ओरिओचे (गो एडिशन), तर दोन जीबीसाठी अॅंड्रॉइड ८.१. ओरिओचा सपोर्ट असलेला ‘झेड६१’ हा अत्युच्च अनुभव देतो. तीन हजार एमएएचची बॅटरी कार्यक्षमता वाढवते आणि एकदा चार्ज केल्यानंतर ती दीड दिवस चालते. याशिवाय, ही बॅटरी एआय तंत्रज्ञानावर आधारीत असून, हे तंत्रज्ञान केवळ फोनच्या बॅटरीच्या वापरावरच केवळ देखरेख ठेवत नाही, तर वापरकर्त्याने जरासुद्धा हात न लावलेले बॅकग्राउंडला सुरू असलेले अॅपही बंद करते.

या डिव्हाइसमध्ये १.५ गिगाहर्ट्झ क्वॉड कोअर प्रोसेसर असून, एक जीबी, दोन जीबी रॅम आणि १६ जीबी रोममुळे ग्राहकाला संगीत, व्हिडिओ, फोटो, अॅप्लिकेशन्स आणि अन्य डाटा ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. ‘लाव्हा झेड६१’च्या होमस्क्रीनवर भाषेचा शॉर्टकट देण्यात आला आहे. ज्याद्वारे वापरकर्त्याला सिस्टीमसाठी अतिशय सुलभरित्या आपल्याला पाहिजे असलेली भाषा निवडून संवाद साधता येऊ शकतो. याशिवाय, आपल्या स्वत:च्या भाषेत एसएमएस वाचविण्याचा पर्याय देखील वापरकर्त्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनसाठी ग्राहकाला एकदा स्क्रीन बदलून देण्याची विशेष ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर ३० सप्टेंबर २०१८पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ‘लाव्हा झेड६१’साठी लागू आहे. सर्व श्रेणीच्या फोर-जी स्मार्टफोन्सवर विशेष कॅशबॅक ऑफरसाठी ‘लाव्हा’ने जागतिक दर्जाचे सर्व आयपी फोर-जी एलटीई नेटवर्क आणि जगातील सर्वात मोठे मोबाईल डाटा नेटवर्क असलेल्या रिलायन्स जिओबरोबरही भागीदारी केली आहे. जिओ सिमकार्डसमवेत नवीन ‘झेड६१’ वापरणाऱ्या ग्राहकाला दोन हजार २०० रुपयांचा ताबडतोब परतावा देण्यात येणार आहे. या ऑफरअंतर्गत ‘झेड६१’च्या सर्व वापरकर्त्यांना प्रत्येकी ५० रुपयांची ४४ कॅशबॅक व्हाउचर्स देण्यात येतील. १९८ रुपयांच्या किंवा २९९ रुपयांच्या पहिल्या रिचार्जवर ग्राहकांना ते दिले जातील. हे व्हाउचर्स ‘मायजिओ’ अॅपमध्ये उपलब्ध असतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search