Next
आयएसआय चिन्हांकित हेल्मेटचा वापर योग्य
प्रेस रिलीज
Thursday, August 16, 2018 | 05:54 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘लवकरच सरकार आयएसआय मानांकित हेल्मेट वापरण्याबाबत कठोर अंमलबजावणी करणार असून, यामुळे नकली हेल्मेट विक्रीला आळा बसेल आणि लोकांचे जीव वाचतील. सरकारचे हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे’, असे मत टू व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वांत मोठ्या हेल्मेट उत्पादक असलेल्या ‘स्टीलबर्ड’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कपूर यांनी व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले, ‘रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे येत्या ६० दिवसांत ही अधिसूचना लागू होण्याची शक्यता आहे.  या अधिसूचनेनुसार, दुचाकीसाठी बिगर इंडियन स्टँडर्ड (नॉन-आयएसआय) हेल्मेट वापरल्यास कोणत्याही वॉरंटशिवाय तुम्हाला अटक होऊ शकते. पहिल्या गुन्ह्यासाठी सुमारे दोन वर्षांचा तुरूंगवास किंवा किमान दोन लाख रूपयांचा दंड आकारला जाऊ शकतो, तर त्यानंतरच्या गुन्ह्यांसाठी जास्त मोठी शिक्षा होऊ शकते.बिगर आयएसआय चिन्हांकित हेल्मेटची विक्री, उत्पादन, साठवणूक आणि वापर बंद करण्यातील हे एक मोठे पाऊल असून त्याचा फायदा नागरिकांना होईल. आयएसआय चिन्हांकित नसलेल्या हेल्मेटची विक्री ही खोटी औषधे विकण्यासारखी आहे. खोटी औषधे धोकादायक आणि विषारी असतात, त्याचप्रमाणे खोटी हेल्मेटही असतात. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मोठे आणि सखोल परिणाम होतील. युरोपियन आणि यूएस दर्जानुसार भारतात हेल्मेट पाठवणाऱ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सनाही आता आयएसआय दर्जाचे पालन करावे लागेल.आयएसआय दर्जाचे पालन न करणाऱ्या सर्व उत्पादकांनी आता उत्पादन बंद करावे. ज्या लोकांनी ही नकली उत्पादने खरेदी केली आहेत, त्यांनी त्याचा वापर करू नये. ती धोकादायक आहेत आणि त्यामुळे गंभीर दुखापती होऊ शकतात. मोटरवाहन कायद्यानुसार, प्रत्येक दुचाकीचालकाने फक्त आयएसआय चिन्हांकित हेल्मेटच वापरावीत आणि ही सूचना पुढील काळात सक्तीच्या स्वरूपात येईल.’

‘आयएसआय चिन्हांकित नसलेल्या हेल्मेटची विक्री आणि उत्पादन होणार नसल्यामुळे कोणालाही कमी दर्जाची उत्पादने मिळणार नाहीत. त्यामुळे रस्त्यांवरील अपघातांमुळे होणाऱ्या दुखापती कमी होतील. यामुळे पोलिस, वैद्यकीय खर्च, रूग्णालये, विमा इत्यादींवर खर्च होणारा सरकारचाही खूप पैसा वाचेल. या उद्योगाचा भाग म्हणून मी भारत सरकारचे पुन्हा एकदा हे महत्त्वाचे पाऊल उचलल्याबद्दल आभार मानतो. उपलब्ध माहितीनुसार, देशभरात १.५० लाखांहून अधिक लोक रस्त्यावरील अपघातांत मरण पावले आहेत. सरकारच्या या पावलानंतर आगामी वर्षांमध्ये लाखो लोकांचे जीव वाचवता येऊ शकतील,’ असेही कपूर यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link