Next
नाशिकच्या नोट प्रेसमध्ये दहशतवादविरोधी मॉक ड्रिल
दिल्लीच्या विशेष सुरक्षा विभागाकडून प्रात्यक्षिक आणि सुरक्षेची पाहणी
BOI
Monday, May 27, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this article:


नाशिक : देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक रोड येथील ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’च्या सुरक्षिततेची चाचणी घेण्यासाठी नुकतेच याठिकाणी दहशतवादविरोधी मॉक ड्रिल करण्यात आले. केंद्रीय सुरक्षा समितीने हे मॉक ड्रिल केले असून या वेळी दिल्लीच्या विशेष सुरक्षा विभागाकडून या प्रात्यक्षिकाची व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. 

दहशतवाद्यांनी प्रेसवर बॉम्ब टाकल्यास अथवा तत्सम एखादी दुर्घटना घडल्यास परिस्थितीशी दोन हात करण्यास पुरेशी सज्जता आहे का, हे तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात आले. 

सबंध देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणारे नाशिक रोडवरील नोट प्रेस हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी तेलगी स्टँप घोटाळा झाला होता. प्रेसमधील गेट व भिंतीभोवती जवानांचा पहारा असतो. या प्रेसच्या आवारात कामगारांव्यतिरिक्त इतर कोणीही जाऊ शकत नाही.

मॉक ड्रिलमध्ये उपायुक्त दर्जाचे दोन अधिकारी, महाराष्ट्र पोलिस, १४५ कमांडो, १० फायटिंग हिट्स, बीडीडीएस टीम, सर्वेलन्स टीम, संपर्क कक्ष, स्नायपर, सहा गॅझेटेड अधिकारी, २२ असिस्टंट कमांडंट आणि विविध विभागांतील सुरक्षेसंबंधी काम करणारे कर्मचारी सहभागी झाले होते. नाशिक पोलीस आयुक्त हद्दीतील विविध पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. 

नाशिक रोड येथे सकाळी साडे सात वाजता सुरू करण्यात आलेले हे मॉक ड्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते. अंतर्गत सुरक्षा आणि सुरक्षारक्षकांच्या कामाची गुणवत्ता या गोष्टींची पाहणी करण्यासाठी दिल्लीवरून खास समिती आली होती.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search