Next
‘पिकाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न’
जिल्हा कृषी महोत्सवाचे डोंबिवलीत उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 03:54 PM
15 0 0
Share this article:ठाणे : ‘राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार प्रयत्न करीत असून, शेतकरी सन्मान योजनेची ठाणे जिल्ह्यात उत्तम अंमलबजावणी करण्यात येईल,’ असे बंदरे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

डोंबिवलीत आयोजित केलेल्या जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन सात फेब्रुवारी २०१९ रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. हा कृषी महोत्सव ११ फेब्रुवारीपर्यंत डोंबिवलीच्या सावळाराम महाराज म्हात्रे स्टेडीयम येथे सुरू राहणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, कृषी सभापती उज्ज्वला गुळवी, महिला बालकल्याण सभापती दर्शना ठाकरे, जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने, आत्माचे प्रकल्प संचालक पी. एम. चांदवडे हे उपस्थित होते.या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले, ‘शेतकऱ्यांना गट स्थापन करण्यासाठी शासन मदत करीत असते, या माध्यमातून त्यांना त्यांचा विकास करता येणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी संबंधित योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रयोग सुरू  असून शेतकऱ्यांनी या संशोधनाचाही फायदा करून घ्यावा. वांगणीमध्ये फुलणाऱ्या गुलाबाची विदेशात निर्यात होते त्याप्रमाणे जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी फुलशेती व भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर करावी. बदलापूर परिसरात मोगऱ्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते; परंतु शेतकरी बाजारपेठेत वेळेवर पोहचू शकत नाही.’

मंजुषा जाधव म्हणाल्या, ‘डोंबिवलीतील या कृषी महोत्सवालादेखील चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. वाडा परिसरातील पिकविल्या जाणाऱ्या भाताला आरोग्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्व असल्याने डॉक्टर्ससुद्धा याची दखल घेतात. शहापूर भागात होणाऱ्या भेंडीची निर्यात परदेशात होते ही जिल्ह्याच्या दृष्टीने समधानाची गोष्ट आहे.’      येत्या १४ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषी पुरस्कार मिळालेल्या कैलास राघो बराड (शहापूर), दिलीप बाबाजीराव देशमुख (वांगणी), लक्षमण गंगा पागी (शहापूर), विनायक मारुती पोटे, विजया अरविंद पोटे यांचा राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या शिवाय ‘आत्मा’अंतर्गत गट राजमाता शेतकरी स्वयंसहायता गट, कृषिभूषण शेतकरी स्वयंसहायता गट, समर्थ सेंद्रिय भाजीपाला उत्पादक गट, सप्तशृंगी शेतकरी गट यांचादेखील सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कल्याण, शहापूर, मुरबाडमधील ३१ शेतकऱ्यांनाही गौरविण्यात आले.

या वेळी कृषी प्रदर्शनात ३० दालने शासनाच्या विभागांची असतील, तर २५ कृषी निविष्टा, पाच दालने कृषी तंत्रज्ञान, ३० दालने गृहोपयोगी वस्तू, पाच दालने कृषी यंत्रसामुग्री व अवजारे, त्याचप्रमाणे ५५ दालने ही धान्ये व खाद्यपदार्थांची असतील. नामवंत कंपन्यांचा यात समावेश आहे. या कृषी महोत्सवात विविध परिसंवाद, चर्चासत्रे, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search