Next
अॅटलास कॉपको ची नवी उपकंपनी ‘एपिरॉक’
प्रेस रिलीज
Saturday, December 30 | 01:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एपिरॉक’ या आपल्या उपकंपनीने एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याचे आणि ग्राहकांना खाणकाम, पायाभूत सुविधा व नैसर्गिक संसाधने या क्षेत्रांतील आघाडीची उत्पादने व सेवा देण्यास सुरूवात केल्याचे ‘अॅटलास कॉपको’ या स्विडिश औद्योगिक कंपनीने जाहीर केले आहे.

अॅटलास कॉपको व एपिरॉक यांचे व्यवसायाचे मार्ग भिन्न असतील; पण सर्व ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने त्यांचा नावीन्य व बांधिलकीचा वारसा एकच असेल. अॅटलास कॉपकोची ‘कामगिरीमध्ये एकता व नाविन्याने प्रेरित’ ही एकशे ४४ वर्षांची परंपरा एपिरॉक कायम ठेवणार आहे. कंपनी भारतातील खाणकाम क्षेत्राला नाविन्यपूर्ण व सक्षम स्थानिक ग्राहक सेवेमार्फत अत्यंत उत्पादक उपकरणे देणार आहे.

यानिमित्त बोलताना ‘एपिरॉक मायनिंग इंडिया लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक जेरी अँडरसन म्हणाले, “आम्ही नव्या बिझनेस एंटिटीविषयी आनंदी असून, खाणकाम व सिव्हिल इंजिनीअरिंग उपकरणे या क्षेत्रात ठसा उमटवण्यासाठी उत्सुक आहोत. एपिरॉक अर्गोनॉमिक उत्पादने व सेवा देणार असून; त्यामुळे आमच्या ग्राहकांना उत्पादकता, ऊर्जाक्षमता व सुरक्षितता यामध्ये वाढ करण्यासाठी मदत होईल.”

एपिरॉकचे अद्ययावत कारखाने नाशिक व हैदराबाद येथे असून, बेंगळुरू येथे जागतिक दर्जाचे इंजिनीअरिंग केंद्र आहे. देशभर कंपनीची विक्री व प्रादेशिक कार्यालये आहेत. याशिवाय चॅनेल पार्टनरचे नेटवर्क अत्यंत सक्षम असून, त्यामध्ये समर्पित व उत्साही टीम सहभागी आहे. एपिरॉक इंडियाचे भारतात एक हजारपेक्षा कर्मचारी आहेत.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link