Next
महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ‘फिल्म शो’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 05:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहात विविध प्रकारचे माहितीपर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हे फिल्म शो गांधीभवन, कोथरूड येथे एक ते आठ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये दाखवले जातील,’ अशी माहिती ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संस्थेचे सचिव अन्वर राजन यांनी दिली.
    
‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला ७१ वर्षांनंतरही सांगणे अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत. यामध्ये माहिती देणारे हे फिल्म शो आहेत,’ असे डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले.

दोन ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या दिवशी ‘गांधी’ फिल्म शोचे दुपारी तीन वाजता सादरीकरण होणार आहे. तीन ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता ‘लाइफ इज ब्युटीफुल’ (१९९७) हा ऑस्कर विजेता चित्रपट, चार ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता ‘बेन-हर’ (२०१६) या १९५९ च्या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक, पाच ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता जाती अंताचा पुरस्कार करणार्‍या ‘अजात’ पथावरील माहितीपट, सहा ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता ‘मॉडर्न टाईम्स’ (चार्ली चाप्लीनचा गाजलेला चित्रपट) आणि सात ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता माधव कुलकर्णी या गांधीवादी स्वातंत्र्यसैनिकावरील माहितीपट दाखवला जाईल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search