Next
हॅवमोर आईस्क्रीमचे ‘मेड फॉर इंडिया फ्लेवर्स’
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 02:42 PM
15 0 0
Share this story


अहमदाबाद :  शुद्ध दुधापासून बनलेल्या आईसक्रिमचा प्रमुख ब्रँड असलेल्या हॅवमोरने,  भारतीय अभिरुची लक्षात घेऊन आणखी काही नवीन चवीची आईस्क्रीम्स बाजारात दाखल केली आहेत. यामध्ये चाय बिस्किट, गुलाब पेटलपंच, पान,  गुलकंद,  अंजीर, रस मलाई आणि शाही खीर यांचा चवींचा समावेश आहे.

हॅवमोर आईस्क्रीमचे मार्केटिंग हेड व उपाध्यक्ष चैतन्य रेळे या नव्या उत्पादनांविषयी म्हणाले, ‘भारतीय चवीची आठवण करून देणाऱ्या ‘मेड फॉर इंडियन फ्लेवर्स’ची ओळख करून देणे हे आमचे ह्या सिझनचे मुख्य ध्येय होते. पारंपारिक फ्लेवर्स देऊ केल्यामुळे ग्राहकांना केवळ नवीन फ्लेवरची चवच चाखायला मिळणार नाही तर ते आपल्या भूतकाळातल्या आठवणीतसुद्धा रमतील. हे फ्लेवर्स देशी साहित्यासह अगदी कुशलतेने तयार केले आहेत. वेगळ्या व रूचकर फ्लेवर्सच्या बरोबरीनेच, आईस्क्रीमच्या स्वरुपात ग्राहकांना स्थानिक मिठाईचा स्वाद आणि फ्लेवर देऊन तृप्त करणे हा हॅवमोरचा उद्देश आहे. #TheCoolestSummerJob2017 च्या आमच्या विजेत्यांनासुद्धा आम्ही ह्या प्रयत्नांत सहभागी करून घेतले आहे. आधुनिक आणि पारंपारिक यांचे अचूक मिश्रण असलेल्या चवी त्यांनी आणल्या आहेत आणि स्थानिक अभिरुची काय आहे हे त्यांनी पक्के लक्षात ठेवले आहे. चाय बिस्कीट व रोझ पेटल पंच ही संकल्पना ह्या विजेत्यांचीच आहे. दहा रुपयांपासून ते २८० रुपयांपर्यंत कुल्फी, कप, नॉव्हेल्टी, सिग्नेचर ट्यूब, अशा विविध श्रेणींमध्ये हे आईसक्रिम्स उपलब्ध होतील.’

चाय बिस्कीट : यात दोन्ही बाजूंनी बिस्कीटचा थर असून त्यात भारतीय वनस्पती व मसाल्यांच्या मिश्रणांनी बनवलेले आईस्क्रीम आहे. चहा हे सर्वव्यापी भारतीय पेय, आता आईस्क्रीमच्या स्वरूपात उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पारंपारिक पेय अनोख्या रुपात सादर करणारा हॅवमोर हा भारतातला सर्वात पहिला ब्रँड आहे.
रोझ पेटल पंच: गुलाब पाकळ्यांपासून बनवलेली ज्युसी आईसकँडी.
पान: पान, खजूर, गुलकंद, बडीशेप व फळे यांच्या मिश्रणातून बनवलेले खास जेवणानंतरची आईस्क्रीम ट्रीट. पान हे मुखशुद्धी  म्हणून भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. आपल्या स्वादिष्ट घटकांनी युक्त असा हा अनोखा फ्लेवर आईस्क्रीम प्रेमींना नक्कीच भुरळ पाडेल.
पान, गुलकंद, अंजीर कुल्फी : कुल्फी श्रेणीअंतर्गत हे नवीन प्रकार आणले आहेत. पान कुल्फी ही भारतीय पानाची अस्सल चव देते. गुलकंद कुल्फी ही गुलाब पाकळ्या साठवून केलेल्या गुलकंदापासून बनवली आहे. ताजे अंजीर आणि काजू एकत्र करून अंजीर कुल्फी बनवली आहे.
रस मलाई आणि शाही खीर: आईस्क्रीमच्या स्वरुपातील या दोन पारंपारिक मिठाई, गोड खाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रुट्स व शुद्ध दूधाचा आनंद देतील. रस मलाई ही ‘रसगुल्ला’ ह्या अस्सल बंगाली मिठाईची चव देईल.  शाही खीर म्हणजे कॅरमलाइज्ड दूध व ड्राय फ्रुट्स पासून बनवलेली अगदी राजेशाही मेजवानी होय.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link