Next
‘सरकारच्या कामांची जनमानसात चांगली प्रतिमा’
माधव भांडारी यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, November 27, 2018 | 12:14 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात केलेल्या अनेक चांगल्या कामांची सर्वसामान्य नागरिकांकडून योग्य ती दखल घेतल्याचा प्रत्यय येतो आहे. या २६/११च्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारच्या कार्यकाळात, भारत अतिरेकी हल्ल्यापासून सुरक्षित आहे का ? असा प्रश्न एका जनमत चाचणीत विचारला असता देशातील ७५ टक्के नागरिकांनी, ‘होय’ असे उत्तर देऊन भाजपच्या चांगल्या कामाला थेट पोचपावती दिली आहे. ही समाधानाची बाब आहे’, असे महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटले आहे.  

महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी
‘सातत्याने टिकेची झोड उठवणारे विरोधक आणि त्यांच्या सूरात सूर मिसळणारा विविध माध्यमांमधील विशिष्ट वर्ग भाजप सरकारच्या चांगल्या कामाची दखल घेताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांकडून सातत्याने सरकारच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाते. यातच भाजपचे यश दडले आहे’, असेही भांडारी यांनी नमूद केले.

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रसार माध्यमांमधून अनेक विषयांवर भाष्य केले जात आहे. त्या वेळेच्या सुरक्षेबाबत आणि त्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणांनी घेतलेल्या काळजीच्या पार्श्वभूमीवर ‘याहू डॉट कॉम’ या वेबसाईटवर सोमवारी, २६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिवसभर जनमत चाचणी घेण्यात आली. त्यात भाजप सरकारच्या कार्यकाळात भारत अतिरेकी हल्ल्यापासून सुरक्षित आहे का ? हा प्रश्न विचारण्यात आला. त्याला प्रतिसाद देत दुपारी साडेचार वाजेपर्यंत दहा हजार ७४३ जणांनी सहभाग घेतला. त्यातील ७५ टक्के सहभागींनी, ‘होय’ असे उत्तर दिले, तर १७ टक्के सहभागींनी ‘नाही’ हे उत्तर दिले. आठ टक्के सहभागींनी ‘काही बदल झाला नाही’ असे उत्तर दिले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search