Next
अण्णा भाऊ साठे यांची समग्र माहिती वेबसाइटवर
कॅटलिस्ट फाउंडेशनचा उपक्रम; लवकरच अनावरण
BOI
Thursday, August 01, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : अलौकिक प्रतिभेचे धनी असलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची संपूर्ण माहिती देणारी पहिली वेबसाइट तयार करण्यात आली असून, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कॅटलिस्ट फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे. लवकरच खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या वेबसाइटचे अनावरण होणार आहे. 

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा एक प्रयत्न म्हणून माजी पत्रकार सुनील माने यांनी कॅटलिस्ट फाउंडेशनची स्थापना केली आहे. सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण क्षेत्रात ही संस्था काम करते. खासदार गिरीश बापट हे या संस्थेचे पालक, तर सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर मेंटॉर आहेत.

अण्णा भाऊ साठे यांच्यावरील वेबसाइट नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचे महान कार्य डिजिटल स्वरुपात जनतेसमोर आणण्याच्या निश्चयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. अण्णा भाऊ साठे यांचे अलौकिक व्यक्तिमत्व, त्यांची व्यापक साहित्य संपदा, स्वातंत्र्य संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील त्यांचे योगदान, लोकशाहीर म्हणून त्यांनी केलेले समाजप्रबोधन या विषयीची एकत्रित माहिती या माध्यमातून देण्याचा संस्थेचा प्रयास आहे. राज्य सरकारने प्रकाशित केलेले त्यांचे साहित्यही येथे उपलब्ध असेल. त्याची परवानगी साहित्य संस्कृती मंडळाने फाउंडेशनला दिली आहे.

‘बदलत्या युगाप्रमाणे माहितीचे अदानप्रदान करण्यासाठी आजची तरुणाई मोबाईल, संगणक आणि इंटरनेटसारख्या डिजिटल माध्यमांना प्राध्यान्य देते. तरुणांसाठी काम करणारी ही संस्था असल्याने अण्णा भाऊंचा चरित्रपट वेबसाइटच्या माध्यमातून साकारण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. हा उपक्रम लोकाभिमुख असून, यास तरुणांचा प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो,’ असे संस्थेच्या सचिव लक्ष्मीकांता माने यांनी म्हटले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search