Next
‘मेरी आवाज मेरी पहचान’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
BOI
Monday, July 08, 2019 | 04:19 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : येथील ‘सूरसुदान शौर्या स्वर संस्थे’तर्फे आयोजित कराओके गायन स्पर्धा ‘मेरी आवाज मेरी पहचान २०१९’ला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक जुलैला डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली व त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. 

२२, २३ व २९ जून असे तीन दिवस ही कराओके स्पर्धा घेण्यात आली. यासाठीच्या ऑडिशनमध्ये ३०० जणांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा पाच गटांत विभागलेली होती. एक जुलैला सायंकाळी चार वाजल्यापासून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी ८४ जणांची निवड करण्यात आली होती. या सर्वांनी अंतिम फेरीत एकापेक्षा एक उत्तम गाणी सादर केली. अंतिमतः पाच गटांमधून एकूण ३७ गायक स्पर्धकांनी बक्षिसे पटकावली. या सगळ्यांत अभिमानाची बाब म्हणजे, ३४ वर्षांचा अंध स्पर्धक धीरज गिरी याने या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. धीरज लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वस्तूंची विक्री करतो आणि याच कमाईतून त्याने गायनात विशारद पदवी प्राप्त केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी व सचिव नम्रता ओवळेकर-राणे यांनी दिली. 

‘इंटरनॅशनल मॅनेजमेंट इव्हेंट युनिट’चे अध्यक्ष वीरेंद्र शंकर हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अंतिम विजेत्यांपैकी काही जणांना आपण आपल्या इव्हेंटमधून संधी देणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. आनंद मेनन, त्रिपती सोनकार आणि प्रशांत काळुंद्रेकर यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. 

‘सूरसुदान शौर्या स्वर’ प्रस्तूत ‘मेरी आवाज मेरी पहचान’ स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे - 
गट- ‘अ’ (वयोगट आठ ते १५ वर्षे) - प्रथम - अनन्या कुमार, द्वितीय - आर्या क्षीरसागर, तृतीय - अवनी कुमार आणि उतेजनार्थ - वेदांत फसे व संस्कृती जगदाळे  
गट - ‘ब’ (वयोगट १६ ते ३० वर्षे) - प्रथम - प्रबुद्ध जाधव, द्वितीय - नंदिनी परिपाक, उत्तेजनार्थ - रेणुका राजदेरकर आणि रोहित मेहता  
गट - ‘क’ (वयोगट ३१ ते ४५ वर्षे) - पुरुष - प्रथम - मोहन मुसळे, द्वितीय - धीरज गिरी, तृतीय - शशी नायर आणि उत्तेजनार्थ - ओमकार धोत्रे व धनंजय स्वामी  
महिला गट - प्रथम - विजया प्रधान, द्वितीय - शर्मिष्ठा बासू, तृतीय - गौरी काणे, उत्तेजनार्थ - श्रद्धा म्हात्रे व मीरा शर्मा  
गट – ‘ड’ (वयोगट चार ते ६० वर्षे) - पुरुष - प्रथम - व्यंकटेश कुलकर्णी, द्वितीय - नंदन जोशी, तृतीय - आशिष लुथिया, उत्तेजनार्थ प्रसाद गद्रे व पंकज जोशी  
महिला - प्रथम - पल्लवी जयवंत, द्वितीय - भारती दगरा, तृतीय - निशा पंचाल  
गट – ‘इ’ (वयोगट ६१ वर्षे पुढील) - पुरुष, प्रथम - शरद इंगळे, द्वितीय - सुहास कुलकर्णी, तृतीय - प्रबोध चौबे, उत्तेजनार्थ - राघवेंद्र ओडियार आणि मोरेश्वर ब्राह्मे. 
महिला - प्रथम - सुरेखा जोशी, द्वितीय - सुखदा ठाकूर आणि तृतीय क्रमांक - शीतल गडकरी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search