Next
‘आयआयएफएल’तर्फे पुणे येथे ‘रंगों का मिलन’ स्पर्धा
प्रेस रिलीज
Friday, April 05, 2019 | 03:27 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘आयआयएफएल फायनान्स’ ही भारतातील एक सर्वात मोठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असून, सामाजिक बांधिलकीच्या हेतूने ‘आयआयएफएल’ फाउंडेशनने ‘आयआयएफएल’ने ‘रंगों का मिलन’ चित्रकला व स्लोगन स्पर्धा आयोजित केली होती.

ही स्पर्धा एकाच दिवशी देशातील ७००हून अधिक शहरांतील ‘आयआयएफएल’च्या एक हजार २४०हून अधिक शाखांमध्ये घेण्यात आली. ‘निरोगी भारत’, ‘शिक्षित बालिका’ व ‘जल संवर्धन’ असे स्पर्धेसाठी विषय दिले होते. विविध वयोगटांतील ३९ जाकर २०० नागरिका स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये सर्जनशीलतेची दखल घेण्यात आली व गौरवण्यात आले, शिवाय सामाजिक समस्यांबाबत जागृतीही करण्यात आली.‘आयआयएफएल फायनान्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमिती बाली म्हणले, ‘आयआयएफएल फायनान्स ही एक जबाबदार संस्था असून, आपल्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये ‘ईसीजी’चा म्हणजे एन्व्हॉयर्नमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स या उद्दिष्टांचा समावेश करते. ‘आयआयएफएल मिलन’ हे गेल्या १३ वर्षांत आमच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या समाजातील सदस्यांचे ऋण फेडण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. ‘रंगों का मिलन’द्वारे आम्ही पर्यावरण, मुलींचे शिक्षण व चांगले आरोग्य या समस्यांविषयी जागृती वाढवण्यासाठी योगदान दिले आहे.’

‘आयआयएफल’ समूहाची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असणारी ‘इंडिया इन्फोलाइन फायनान्स लिमिटेड’ ही महत्त्वाची नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपनी असून, ती लोकांच्या ठेवी स्वीकारत नाही आणि घर व मालमत्ता कर्जे, लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज, कमर्शिल व्हेइकल फायनान्स, गोल्ड लोन, एसएमई व्यवसाय व मायक्रो-फायनान्स लोन्स यामध्ये कार्यरत आहे. ‘आयआयएफएल फायनान्स’ला क्रिसिलकडून एए (स्टेबल) हे दीर्घकालीन क्रेडिट रेटिंग मिळाले आहे, ‘आयसीआरए’कडून एए (स्टेबल) व केअरकडून एए (पॉझिटिव्ह) रेटिंग मिळाले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search