Next
‘सीएसआर’मध्ये ‘बजाज’चे सर्वाधिक योगदान
प्रेस रिलीज
Thursday, April 19, 2018 | 12:42 PM
15 0 0
Share this story

पुणे : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०१७संबंधी जाहीर केलेली आकडेवारी विचारात घेता, महाराष्ट्रातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांसाठी सर्वाधिक योगदान देणारी बजाज अॅलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.

कंपनीने या वर्षी महाराष्ट्रात १६.९० कोटी रुपये खर्च केले आहेत. कंपनीने राबवलेले काही प्रमुख प्रकल्प शिक्षण, व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण, आरोग्यसेवा व पर्यावरणीय शाश्वतता या क्षेत्रांतील असून, ते प्रामुख्याने पुणे, औरंगाबाद व मुंबई येथे राबवण्यात आले.

‘बजाज अॅलियांझ’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ यांनी सांगितले, ‘कॉर्पोरेट विश्वाचा एक भाग म्हणून आम्ही समाजाच्या एकंदर प्रगतीसाठी योगदान द्यायला हवे, असे मला वाटते. या प्रगतीसाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहू व या प्रगतीला व विकासाला हातभार लावतील, अशा विषयांना पाठिंबा देऊ.’

कंपनीची ‘सीएसआर’ धोरणे कंपनी कायदा, २०१३ यास अनुसरून आहे आणि विशेष ‘सीएसआर’ विभागामार्फत प्रकल्पांची निवड व अंमलबजावणी केली जाते.
 
‘बजाज अॅलियांझ’विषयी :
बजाज अॅलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपन्यांपैकी एक आहे. बजाज समूहाच्या वित्तीय सेवांशी संबंधित व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी असलेली बजाज फिनसर्व्ह लिमिटेड व जगातील आघाडीचा विमा समूह अॅलियांझ एसई यांच्यातील संयुक्त भागीदारी आहे.

कंपनीने २००१मध्ये कार्य सुरू केले आणि ३१ जानेवारी २०१८पर्यंत देशात कंपनीच्या ६३१ शाखा आहेत. ग्राहकांना त्यांच्या जीवनातील विविध उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होण्यासाठी कंपनी पारंपरिक विमा उत्पादने व युलिप यांचा समावेश असलेल्या अनेक उत्पादनांद्वारे विमा उत्पादने उपलब्ध करते. कंपनी समूह विमा व आरोग्य विमा योजनाही देते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link