Next
‘आप’च्या कार्यकर्त्यांनी किन्नरांशी दृढ केले मैत्रीचे बंध
BOI
Monday, August 20, 2018 | 12:14 PM
15 0 0
Share this article:नाशिक :
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन अर्थात फ्रेंडशिप डे सर्वत्र साजरा केला जातो. आपल्या मित्र-मैत्रिणींच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधून हे बंध अधिक दृढ केले जातात. अलीकडे या दिवसाच्या निमित्ताने आपल्या नेहमीच्या वर्तुळाच्या बाहेर पाहण्याची काही उदाहरणे समाजात दिसू लागली आहेत. यंदाच्या मैत्री दिनाला असेच एक उदाहरण नाशिकमध्ये पाहायला मिळाले. समाजात कायमच दुर्लक्षित असलेले तृतीयपंथीय म्हणजेच किन्नरांसोबत मैत्री दिवस साजरा करण्यात आला. आम आदमी पक्षाच्या (आप) नाशिकमधील कार्यकर्त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवून किन्नरांनाही ‘तुम्हीही समाजाचे एक महत्त्वाचे घटक आहात,’ हा विश्वास दिला.

किन्नरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. किन्नरांकडे समाजाकडून दुर्लक्ष होत असले, तरी ते मात्र समाजाबद्दल काहीही तक्रार न करता, त्यांना दोष न देता जगतात. ज्या कुटुंबात अशा बाळाचा जन्म होतो, त्या कुटुंबानेच यांना स्वीकारायला हवे, अशी इच्छा सलमा गुरू यांनी या प्रसंगी व्यक्त केली. ‘आमच्या फार मागण्या नाहीत. शासनदरबारी फक्त इतरांसारखी अधिकृत ओळख मिळावी, हीच आमची  माफक अपेक्षा आहे,’ अशी भावना किन्नर समाजाच्या कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली. आम आदमी पक्ष या किन्नर समाजासाठी दिल्लीत आवाज उठवणार असल्याचे या वेळी किन्नर समाजाला सांगण्यात आले. 

या प्रसंगी सलमा गुरू, छोटे गुरू नाईक, मंजू गुरू, दीपा, आरती, शाहीन यांना यांना कार्यकर्त्यांनी फ्रेंडशिप बँड बांधला. या वेळी आम आदमी पक्षाचे जगबीरसिंग, अश्विनी चोमाल, एकनाथ सावळे, विलास देसले, गिरीश उगले, माजिदभाई पठाण, अश्फाक शेख, चंद्रशेखर महानुभाव, संतोष राऊत, सुमित शर्मा, तेजस सोनार, शुभम पडवळ आदी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search