Next
सॅमसंगच्या गॅलेक्सी श्रेणीत चार नवीन स्मार्टफोन्सची भर
प्रेस रिलीज
Wednesday, May 23 | 06:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : सॅमसंग या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या व सर्वात विश्वासार्ह स्मार्टफोन ब्रँडने इन्फिनिटी डिस्प्ले असलेले चार नवे स्मार्टफोन दाखल केले आहेत. या नवीन ए  व जे श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये सॅमसंगच्या सिग्नेचर इन्फिनिटी डिझाइनचा वापर केला आहे. या फोन्सची किंमत १३ हजारांपासून पुढे आणि २५ हजारांपर्यंत आहे. सॅमसंगने २० जूनपर्यंतच्या खरेदीवर  वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरही  जाहीर केली आहे.

गॅलेक्सी जे६, जे८, ए६, ए६प्लस अशा चार स्मार्टफोन्समध्ये इन्फिनिटी डिझाइनचा समावेश असून, यामुळे स्मार्टफोनचा आकार न वाढवताही ग्राहकांना अंदाजे १५ टक्के अधिक डिस्प्ले दिसणार आहे. अत्यंत पातळ बेझल्समुळे, तसेच सॉफ्टवेअरचे पाठबळ असलेल्या इन-डिस्प्ले होम बटण असलेल्या भौतिक स्वरूपातील होम बटणवर क्लिक केल्याने हे शक्य होणार आहे. अधिक सोय मिळावी म्हणून फिंगर प्रिंट सेन्सर स्मार्टफोनच्या मागे आहे. डिस्प्ले हार्डवेअरमधील या सर्व बदलांमुळे स्मार्टफोन स्क्रीन पाहण्याचा परिपूर्ण अनुभव मिळतो.  इन्फिनिटी डिस्प्लेला  नव्या ‘चॅट ओव्हर व्हीडिओ’ वैशिष्ट्याची जोड दिली आहे. त्यामुळे चॅटिंग करत असातनाही स्मार्टफोन पाहताना कोणतेही अडथळे येत नाहीत. गॅलेक्सी ए श्रेणी स्मार्टफोनमध्ये मेटल युनिबॉडी व स्लीक डिझाइन येते. जे श्रेणीमध्ये  प्रीमिअम पॉलिकार्बोनेट युनिबॉडी आहे. चारही स्मार्टफोनमध्ये स्लीक कर्व्ह असून, अर्गोनॉमिक डिझाइन, देखणेपणा आहे.

‘हे स्मार्टफोन प्रामुख्याने आजच्या तरुण पिढीसाठी तयार केले आहेत. या स्मार्टफोनमुळे सॅमसंगच्या सिग्नेचर सुपर अमोलेड इन्फिनिटी डिस्प्लेमुळे व्हीडिओ पाहण्याचा अपूर्व अनुभव मिळणार आहे. या फोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा असून, त्यामुळे ग्राहकांना प्रोफेशनल दर्जाच्या बोकेह इमेज काढता येतील व खास पद्धतीने अभिव्यक्त होता येईल. आमच्या नव्या ‘मेक फॉर इंडिया’ अंतर्गत नावीन्य असलेल्या चॅट ओव्हर व्हीडिओ सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार अखंडितपणे व्हीडिओ पाहण्याचा अनुभव मिळेल. आम्ही नवा आकर्षक निळा रंगही सादर करत आहोत. त्यातून स्टायलिश डिझाइन हवे असलेल्या तरुणांच्या गरजांकडे आम्ही बारकाईने लक्ष देत असल्याचे अधोरेखित होणार आहे’, असे सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदीप सिंग यांनी सांगितले.

‘यामध्ये सर्वोत्तम कॅमेऱ्याचा वापर केला असून, त्यामुळे ग्राहकांना सुंदर इमेजेस किंवा सेल्फी केव्हाही व कोठूनही घेता येतील. ऑक्टा कोअर प्रोसेसर्स आणि प्रगत मेमरी व्यवस्थापन असल्याने या फोनची कामगिरीही लक्षणीय आहे. या स्मार्टफोन्सच्या विक्रीसाठी सॅमसंगने पेटीएम मॉलशी सहयोग केला आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना पेटीएम मॉलवर खरेदी करण्यासाठी उत्तेजन दिले जाते, तसेच त्यांना ऑफलाइन रिटेलरही सेवा देतात’, असेही सिंग यांनी नमूद केले.
 
याबाबत पेटीएम मॉलचे सीओओ अमित सिन्हा म्हणाले,‘नवे सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्स पेटीएम मॉलवर व सॅमसंगची भागीदारी असलेल्या २५ हजार ऑफलाइन स्टोअरद्वारे दाखल करण्यासाठी सॅमसंगशी भागीदारी करण्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत. आमच्या ओ टू ओ  मॉडेलद्वारे आम्ही लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ब्रँडसाठी नेटवर्क निर्माण करणार आहोत. त्यामुळे आमची पुरवठा साखळी वाढणार आहे व मार्केटिंगसाठीही मदत होणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link