Next
‘सोनालीका’च्या श्रेणींचे गिरीश बापट यांच्या हस्ते अनावरण
प्रेस रिलीज
Thursday, December 13, 2018 | 12:24 PM
15 0 0
Share this article:पुणे : सोनालीका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड या कंपनीतर्फे येथे भरवण्यात आलेल्या किसान पुणे एक्सपोमध्ये सोनालीका ट्रॅक्टर्सची ‘जीटी २८’ आणि ‘आरएक्स ४७ सिकंदर’ या दोन नव्या श्रेणी सादर केल्या आहेत. या श्रेणींचे अनावरण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले.

कंपनीने तांत्रिकदृष्ट्या प्रगत ट्रॅक्टर्स असलेल्या २८ एचपी श्रेणीमध्ये ‘जीटी २८’ आणि ५० एचपी श्रेणीमध्ये ‘आरएक्स ४७ सिकंदर फोर डब्ल्यूडी’ या दोन नव्या श्रेणी सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर कंपनीने ५० एचपी श्रेणीमध्ये ‘आरएक्स ४७ सिकंदर टू डब्ल्यूडी’, ५० एचपी श्रेणीमध्ये ‘डीआय ७४५ थ्री,’ ५५ एचपी श्रेणीमध्ये ‘आरएक्स ७५० थ्री’, ५२ एचपी श्रेणीमध्ये ‘आरएक्स ५० सिकंदर’, ६० एचपी श्रेणीमध्ये ‘डब्ल्यूटी ६० फोर डब्ल्यूडी सिकंदर’, ९० एचपी श्रेणीमध्ये ‘डब्ल्यूटी ९० सिकंदर’चे सादरीकरण केले.

या प्रसंगी बोलताना सोनालीका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमन मित्तल म्हणाले, ‘हे एक अत्यंत प्रतिष्ठीत प्रदर्शन होते जेथे आम्ही २८ पासून ९० एचपीपर्यंत आमच्या हेवी ड्यूटी उत्पादन श्रेणीचे प्रदर्शन केले. या प्रदर्शनात आम्ही ‘जीटी २८’ आणि ‘आरएक्स ४७ सिकंदर फोर डब्ल्यूडी’ हे दोन तांत्रिकदृष्ट्या प्रगत ट्रॅक्टर्स सादर केले. यातील ‘जीटी २८’ हा ड्युअल पीटीओ पॉवर आणि ड्युअल लिव्हर हायड्रॉलिक्स सिस्टीमसह अद्यावतपणे तयार केला आहे जो द्राक्षाच्या बागा आणि फळबागांमधील कामांमध्ये आवश्यक हाय एंड अ‍ॅप्लिकेशन्स आणि आधुनिक फवारणीला योग्य ठरतो आणि ‘आरएक्स ४७ सिकंदर फोर डब्ल्यूडी’ हा एचडीएम इंजिन, सीसीएस वर्कस्पेस, एक्सो सेन्सिंगसारखी वैशिष्ट्ये आणि ‘सर्वांत कमी डिझेलमध्ये, सर्वाधिक ताकद आणि गती’च्या आश्वासनासह येतो.’

‘सोनालीका’चे वरिष्ठ उपाध्यक्ष विवेक गोयल म्हणाले, ‘किसान पुणेसारखा कृषी मेळावा, हा आमच्यासाठी शेतकर्‍यांसोबत जोडले जाण्याचा आणि ट्रॅक्टरमध्ये वापरल्या जाणार्‍या नवीन तंत्रांबद्दल त्यांना शिक्षित करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आम्ही महाराष्ट्रामधील शेतकर्‍यांच्या लाभासाठी विविध मॉडल्सवर जवळपासच्या अनेक ऑफर्स सादर केल्या आहेत. आता या दोन नव्या आरंभांसह, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना २० एचपीपासून ते १२० एचपीपर्यंत पूर्ण उत्पादन श्रेणी ऑफर करणारी आम्ही एकमेव कंपनी बनलो आहोत. अंदाजे दर ५० किमी अंतरावर क्षेत्रामध्ये शेतकर्‍यांसाठी उपलब्ध विक्री, सेवा केंद्रामुळे  महाराष्ट्रामधील आमच्या मजबूत अस्तित्वाबद्दल आम्हाला अभिमान आहे.’

महाराष्ट्राचे क्षेत्रीय अध्यक्ष कुलदीप सिंह म्हणाले, ‘महाराष्ट्रात ५० टक्क्यांच्या वर शेतकरी आहेत आणि येथे आम्ही प्रमुख दावेदार आहोत. येथे दोन नवीन ट्रॅक्टर्सचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी होती आणि या पाच दिवसांमध्ये ट्रॅक्टर्स बुक केलेल्या सर्व ग्राहकांना ‘जीटी २८’वर चार लाख ५९ हजार (ऑन रोड) आणि ‘आरएक्स ४७ सिकंदर फोर डब्ल्यूडी’वर सात लाख ५९ हजार (ऑन रोड) ही विशेष किंमत ऑफर करण्यास आम्हाला आनंद होत आहे. सध्या आम्ही शेतकर्‍यांना प्रत्येक ट्रॅक्टर मॉडेलवर पाच वर्षांची वॉरंटी ऑफर करत आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search